अन् कुत्र्याने परिधान केले भगवे वस्त्र...

वणी (यवतमाळ) :
शहरात रामनवमी निमित्त भव्य दिव्य मिरवणूक काढून, शहर भगवेमय करण्यात, याच मिरवणूकीत भाजपचे कार्यकारी सदस्य असलेले विजय चोरडिया यांनी आपल्या श्वानाला भगवे वस्त्र परिधान करुन, मिरवणूकीत सामील केल्याने, मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यामुळे आज (१६ एप्रिल) शनिवारला ,विजय चोरडिया यांनी पत्रकार परिषद घेऊन, खुलासा देऊन दिलगीरी व्यक्त केली.

रविवार (१०एप्रिल)ला शहरातील मुख्य भागातुन रामनवमी निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत राम नवमी समिती अध्यक्ष विजय चोरडिया यांनी,आपल्या श्वानाला भगवे वस्त्र परिधान केल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होते. श्वान हा चोरडिया परिवारातील सदस्य प्रमाणे असल्यामुळे त्याला भगव्या रंगाचे वस्त्र घालण्यात आले. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास विजय चोरडिया यांनी दिलगीरी व्यक्त केली. श्वासनाचे छायाचित्र काढुन,सोशल मिडयावर वायरल करण्याचा विरोधकांचा कट असल्याचे, यावेळी विजय चोरडीया यांनी सांगितले. रामनवमी समिती अध्यक्ष म्हणून निवड होताच विजय चोरडिया यांनी , रक्तदान शिबिर, अन्नछत्र, पाणपोई , गरजुंना मदत करीत समाजकार्य करुन, सामाजिक ऐक्य जोपासण्याचा प्रयत्न केला.

परंतु काही समाज कंठकामुळे अशी परिस्थिती उद्भवली असे विजय चोरडिया म्हणाले. विरोधाला न जुमानता आपले सामाजिक कार्य सदैव असेच सुरु राहील असे त्यांनी सांगितले. यावेळी रामनवमी समिती अध्यक्ष विजय चोरडिया, राजाभाऊ बिलोरिया, शाम भडघरे, अजिंक्य शेंडे, उमेश पोद्दारसह मोठ्या संख्येने राम नवमी सदस्य उपस्थित होते.

माझ्या घरी असलेला पाळीव श्वान हा माझ्या परिवारातील एक सदस्य असुन श्वानाला आम्ही खंडोबा मानतो आणि खंडोबा हे हिंदूंचे दैवत आहे. दैवताचे पूजन करणे हि हिंदू संस्कृती आहे. प्रत्येक सणाला आम्ही जे कपडे परिधान करतो, तेच कपडे त्या श्वानासाठी तयार करतो. ते श्वान माझ्या परिवारातील सदस्याप्रमाणे असल्यामुळे,त्याला भगवा रंगाचे वस्त्र परिधान करण्यात आले. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो.
विजय चोरडिया : अध्यक्ष रामनवमी समिती वणी

Post a Comment

Previous Post Next Post