बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समतेचे प्रतीक ! न्यायाधीश भडके सा.


गडचिरोली. दिनांक १६ एप्रिल.  
              पंचशील बौध्द समाज मंडळ रामनगर, शाहूनगर, कन्नमवार वॉर्ड, कॅम्प एरिया, स्नेहनगर  चे वतीने पंचशिल बुध्द विहार रामनगर येथे " म.फुले डॉ. आंबेडकर जयंती उत्सव  दिनांक ११ ते १४ एप्रिल पर्यंत साजरा करण्यात आला. ११ तारखेला म.फुले जयंती निमित्त प्रमुख मार्गदर्शक प्रा. डांगे व सिध्दार्थ गोवर्धन सा. कार्यकर्ते होते.दिनांक १२ तारखेला समाजातील मुलामुलींचे गीतगतान व नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.दिनांक १३ एप्रिल रोजी स्वरांकित ग्रुप चंद्रपूर यांचा बुध्द भीम गीतांचा प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. बहुसंख्य लोकांची उपस्थिती होती.
      आणि दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता समाज मंडळाचे अध्यक्ष सुखदेव वासनिक यांचे अध्यक्षतेखाली आंबेडकर जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयु. भडके  सा. न्यायाधीश वडसा व आयु. ऍड. कविता महोरकर गडचिरोली तर महेंद्र गणवीर तहसीलदार हे होते , प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर भडांगे , आयु. नंदा खोब्रागडे, सुरागीनि भासरकर सचिव , रुक्मानंद रमटेके हे होते.
       सर्व प्रथम आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले त्यानंतर ध्वजारोहण झाले.मागील दोन वर्षात कोरोनाने मृत्यु पावलेल्या व्यक्तींनी श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच वार्डातील १०,१२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
       मार्गदर्शन करताना अँड. महोराकर यांनी स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे म्हणून म.फुले यांनी स्रियांची शाळा सुरू केली तर डॉ. बाबासाहेबानी हिंदू कोड बिल दिले. अँड. भडके सरांनी बाबासाहेबांची जयंती फक्त एकाच समाजाने साजरी न सर्व बहुजन वर्गानी साजरी करावी कारण बाबासाहेब एकट्या जातीपूर्ते नव्हते तर त्यांनी स्वतंत्र तन समता , बंधुता यावर आधारित संविधान दिले म्हणून ही जयंती  म्हणजे बाबासाहेबांच्या समतेचे प्रतीक होय.
       कार्यक्रमाचे सूत्र संचालन सिध्दार्थ गोवर्धन यांनी प्रास्ताविक रुक्मान्द रामटेके यांनी केले तर आभार तुरे सर सहसचिव यांनी मानले. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मध्ये फार मोठ्या प्रमाणात युवती वर्ग उपस्थित होता.ही मिरवणूक बुध्द विहार- तुकडोजी चौक, रेड्डी गोडाऊन, धानोरा रोड, इंदिरा गांधी चौक ते परत पंचशील बुध्द विहार रामनगर येथे रॅली ची सांगता करण्यात आली.
       हा सोहळा संपूर्ण पने यशस्वी करण्यासाठी वासुदेव कोल्हटकर, मधुकर लोणारे, वनकर, केशव शेंडे,भालेराव सर, डी. ए. मेश्राम,नागसेन खोब्रागडे,निलेश फुलझेले, महेंद्र गेडाम, महीला मंडळाच्या पुष्पा वासनिक, प्रतिमा करमे,मानकर,कुंभारे,हर्षा गेडाम यांनी सहकार्य व अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post