*पिंपळा लोखंडे येथे आरोग्य वर्धिनी दिन साजरा.*

पिंपळा लोखंडे(ता.पूर्णा):-
             प्रा.आ.केंद्र-कावलगाव अंतर्गत उपकेंद्र-पिंपळा लोखंडे येथे ४था आरोग्य वर्धिनी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम नरवाडे सरपंच ग्रा.पं.कार्यालय पिंपळा लोखंडे ,प्रमुख अतिथी म्हणून तुकाराम लोखंडे उपसरपंच ग्रा.पं. कार्यालय पिंपळा लोखंडे, रावसाहेब जाधव  ग्रा.पं.सदस्य पिंपळा लोखंडे ,डॉ.गजानन राऊत वैद्यकीय अधिकारी प्रा.आ केंद्र-कावलगाव,गजानन लोखंडे ग्रामसेवक ग्रा.पं. कार्यालय पिंपळा लोखंडे,डॉ.गोविंद सोळंके,टि.एस.इनामदार आरोग्य सहाय्यक,रवी वैद्य आरोग्य सहाय्यक,शेख एस.आय.आरोग्य सेविका,अनंता दुधाटे आरोग्य सेवक, ग्रामपंचायत सेवक- अब्दुल शेख,ग्रामपंचायत लिपीक अमजद शेख ,कर्ण लोखंडे, उपकेंद्र पिंपळा लोखंडे येथील सर्व आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
              आरोग्य वर्धिनी दिनाचे औचित्य साधून पिंपळा लोखंडे येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. यावेळी बिपी, शुगर, दमा,ताप रुग्णाचे रक्तनमुने, घेण्यात आले. PMMVY,HBNC विषयी माहिती, अंगणवाडीतील लहान मुलांची तपासणी,गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली.आणि गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
         कार्यक्रमाचे संचालन अनंता दुधाटे आरोग्य सेवक यांनी केले.प्रास्ताविक डॉ.गोविंद सोळंके आणि आभार प्रदर्शन शेख एस.आय.आरोग्य सेविका यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपकेंद्र पिंपळा लोखंडे येथील आशा वर्कर यांचे मोलाचे योगदान दिले.

Post a Comment

Previous Post Next Post