*टिळक चौकातील अंगणवाडी परिसरातील घाण साफ करा युवारंग ची मांगणी

आरमोरी :-  शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील टिळक चौक येथील दुर्गामाता मंदिर समोरील अंगणवाडी क्रमांक ०६ च्या परिसरात मागील १ वर्षांपासून घाण झालेली आहे व दुर्गंधी पसरत आहे  या अंगणवाडी परिसरात  वार्डातील लहान  मुले दिवसभर या परिसरात खेळत असतात व अंगणवाडी मध्ये येत असणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे  लवकरात लवकर घाण साफ करावी अशी युवारंग तर्फे  नगर परिषद ला निवेदनाद्वारे मांगणी करण्यात आली याप्रसंगी युवारंग चे अध्यक्ष मा. राहुलजी जुआरे , उपाध्यक्ष मा. मनोजजी गेडाम ,कोषाध्यक्ष मा.प्रफुलजी खापरे , युवारंग चे सदस्य श्रीराम ठाकरे , निखिल बन्सोड उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post