मजूर महिलेवर चक्क तिच्या मेहुण्याने केला अत्याचार

बीड :- जिल्ह्यात उघडकीला आली असून नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात रहिवासी असलेल्या एका मजूर महिलेवर चक्क तिच्या मेहुण्याने अत्याचार केला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई ठाणे हद्दीत हा प्रकार घडला असून सात एप्रिल रोजी गुन्हा नोंदवून पोलीस ठाण्यात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित 31 वर्षीय महिला गेवराई तालुक्यातील गोंडगाव येथे आपल्या पतीसह ऊस तोडणीसाठी आलेली होती. तिच्यासोबत तिची बहीण आणि तिचा पती देखील आले होते. 17 फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी मध्यरात्री पीडित महिला ही कोपीत झोपलेली असताना तिचा 34 वर्षे मेहुणा या खोपीत दाखल झाला आणि त्याने तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला.

पीडित महिलेने आरडाओरडा केला त्यावेळी त्याने तिचे तोंड दाखवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले याप्रकरणी पुढील तपास करत आहे.

💐एका महिन्यात 3 लाख वाचकांनी लोकप्रिय सुपर फास्ट बातमीला भेट दिली💐
              👇👇👇👇

Post a Comment

Previous Post Next Post