*आंबेशीवणी येथे शाळापूर्व तयारी अभियान मेळावा उत्साहात साजरा*

आज दि.16/04/2022 ला उच्च प्राथमिक शाळा आंबेशिवनी येथे शाळापूर्व तयारी अभियान साजरा करण्यात आले यामध्ये शैक्षणिक क्षेत्र 2022 - 2023 मध्ये भरती पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचा शारीरिक विकास ,बौद्धिक विकास ,भाषाविकास ,गणनपूर्व  तयारी इत्यादी स्तर तपासणी करून पूर्ण गोष्टींचे स्टॉल लावण्यात आले तसेच स्टॉल वरती नावाची नोंदणी करण्यात आले, नोंदणी केल्यानंतर त्यांचे वजन, उंची नोंदणी करून त्यांना पुढील 07 स्टॉलवर त्यांचे पूर्व नियोजित तयारी कशा पद्धतीत करायचे त्या संदर्भात त्यांची तपासणी करण्यात आली एक कार्ड तयार केले होते त्या कार्डनुसार त्यांच्या आई आणि वडील या दोन्हींच्या सोबत घेऊन समिती सोबत त्यांनी त्यांचे बौद्धिक विकास कितपत आहे आणि त्याच्यावर त्यांना पुढील वेळेस कोणत्या गोष्टींवर भर द्यावे यासाठी त्यामध्ये तपासणी शाळापूर्व तयारी करण्यात आली. खूप सुंदर असे कार्यक्रम झाले कार्यक्रमात विविध बौध्दिक विकास पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. सौ.सरिता टेंभूर्णे सरपंच ग्रामपंचायत आंबेशिवनी, श्री हरिदास तुकाराम मस्के अध्यक्ष शाळा व्यस्थापन समिति, रीना गौतम साहारे ,मुनघाटे मॅडम ग्रामपंचायत सदस्य , श्री भैसारे साहेब पो.पाटिल आंबेशिवनी ,श्री देवराव काळबांधे, श्री विलास झांजाळ ,श्री राकेश झजाळ ,श्री विठ्ठल बोरुले ,श्री सूर्यवंशी साहेब, श्री चौधरी साहेब तसेच गावातील युवा फ्रेंड्स क्लब आंबेशिवनी चे कोषाध्यक्ष सुरज बाबनवाडे तसेच युवा सदस्य सूरज पाल तसेच युवा मंडळाचे सर्व सदस्य होते तसेच श्री देवाजी बावणे मॅजिक बस फाउंडेशन ,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका, पालक वर्ग, युवा , प्रतिष्ठित व्यक्ती आणि आंबेशिवनी टोली तसेच आंबेशिवनी येथील मुलांचे आई-वडील तसेच जिल्हा परिषद शाळा आंबेशिवनी तसेच टोली येथील शिक्षक वृंद तसेच या कार्यक्रमाला उपस्थित दोन्ही मराठी शाळेतील विद्यार्थी तसेच विद्यार्थीनी उपस्थित होते कार्यक्रमांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते ते खूप सुंदर लहान मुलांनी  शाळेमध्ये कार्यक्रम खूप सुंदर असे  सादर केले. कार्यक्रमाचे आयोजक शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश बांबोळकर सर तसेच कार्यक्रमाचे संचालन माननीय सागर आत्राम सर केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जाहेदा शेख मॅडम यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post