ओबीसी समाजाच्या समस्या आणि उपाय ओबीसी समाज बांधवानो ‘काश्मीर फाईल्स’ सिनेमा पाहिलात का?

ओबीसी समाजाच्या समस्या आणि उपाय
ओबीसी समाज बांधवानो ‘काश्मीर फाईल्स’ सिनेमा पाहिलात का? ओबीसीचा सर्वात जास्त विश्‍वास देवावर असतो. म्हणूनच विचारतो. शांतीपूजा, व्रतवैकल्ये, कार्यात अपयश, कार्यसिद्धी होण्यासाठी, ब्राम्हणाचे उंबरठे झिजवणे, ब्राम्हणी काव्याला बळी पडून स्वकष्टाने कमविलेले धन स्वत:च्या हाताने भटजींना अर्पण करण्याची बौद्धिक क्षमता फक्त ओबीसी समाजात आहे.
ओबीसी समाज बांधवानो ‘काश्मीर फाईल्स’ सिनेमा पाहिलात का? ओबीसीचा सर्वात जास्त विश्‍वास देवावर असतो. म्हणूनच विचारतो. शांतीपूजा, व्रतवैकल्ये, कार्यात अपयश, कार्यसिद्धी होण्यासाठी, ब्राम्हणाचे उंबरठे झिजवणे, ब्राम्हणी काव्याला बळी पडून स्वकष्टाने कमविलेले धन स्वत:च्या हाताने भटजींना अर्पण करण्याची बौद्धिक क्षमता फक्त ओबीसी समाजात आहे. कारण ब्राम्हणांच्या हातून घडलेले कोणतेही कार्य अयशस्वी होत नाही हा शंभर टक्के विश्‍वास ब्राम्हणांना नाही पण ओबीसी समाजाला आहे. म्हणूनच विचारले ओबीसी समाज बांधवानो काश्मीर फाईल्स सिनेमा पाहिलात का?


३३ कोटी देव ज्या मंत्र, यज्ञ, होम ब्राम्हणांच्या मुखातील शब्दातून जागरूक होतात.त्या भट, ब्राम्हणाच्या सर्वोच्च पंडितावर देवभूमीत अन्याय अत्याचार खून झाले हे सत्य असत्य काश्मीर फाईल्स सिनेमाने दाखविले. त्यावर विश्‍वास बसत नाही. ब्राम्हणांच्या मुखातील शब्दातून जागरूक होणारे ३३ कोटी देव पंडितावर होणारे अन्याय अत्याचार खून पाहून गप्प कसे राहिले? हाच तर माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच मला ही गंभीर समस्या दिसते की आम्ही ओबीसी समाजाने कोणावर विश्‍वास ठेवावा. ग्रह,तार्‍याची दिशा बदलणारे अन्याय अत्याचार खून करणार्‍यांची दिशा का बदलू शकले नाहीत.


राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी सांगितले होते. मंदिरात देव नाही, ब्राम्हणांचे पोट आहे. ३३ कोटी देवासाठी मंत्र,यज्ञ,होम ब्राम्हणांच्या मुखातील निघतात तो त्यांचा धंदा आहे. हे बुद्धी असलेल्या मानवानी विसरू नये.बहुसंख्य मागासवर्गीय ओबीसी समाज ब्राम्हणी काव्याला बळी पडून स्वकष्टाने कमविलेले धन स्वतःच्या हाताने भटजींना अर्पण करून क्षणिक समाधान घेत असतील, तर ते रोखणारे आम्ही कोण? 



परंतु आपण जर आपल्या सुखासाठी काही गोष्टी ब्राह्मणांना सांगून त्यांच्या म्हणण्यानुसार आपण सर्व धार्मिक विधी पार पाडत असू तर आपल्या जन्मापासून ते शेवटपर्यंत प्रत्येक गोष्ट ब्राह्मणांच्या मनाप्रमाणे करायला हरकत नाही म्हणजे ना कष्ट,ना मेहनत,ना परिश्रम घरबसल्या सर्वच्या सर्व सोई आपल्याला मिळतील.प्रत्येक गोष्ट ब्राम्हण भटजींना विचारूनच केली तर आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही. 



भारतात अशी परिस्थिती असतांना काश्मीरमध्ये पंडितावर अन्याय अत्याचार होणे अशक्य वाटते.पण काश्मीर फाईल्स सिनेमा १९९० ची परिस्थिती दाखविते. हजारो वर्षापासून ओबीसी मागासवर्गीय,अस्पृश, आदिवासी अल्पसंख्यांक समाजावर धर्माचे होलसेल ठेकेदार ब्राम्हणांनी केलेल्या धार्मिक शोषणाची,अन्याय, अत्याचाराची मांडणी करून कोणी सिनेमा काढेल काय?ओबीसी समाजात आर्थिकदृष्ट्या मजबूत असणारा कोणी विवेक अग्नीहोत्री पुढे येणार नाही याची आम्हाला खात्री आहे.


जगाने किती ही झपाट्याने प्रगती केली असली तरी आपण ओबीसी समाज वैज्ञानिक दृष्टीने विचार करण्यात असमर्थता व्यक्त करतो.कारण लहानपणापासूनच आपल्यावर ब्राम्हणांनी धर्माचे संस्कार केले असतात त्यात अविश्‍वास हा शब्दच नसतो.आपण सुशिक्षित आहोत की अडाणी आहोत हे महत्वाचे नसून आपण वैचारिक दृष्टीने किती कमजोर आहोत हे खूपच महत्वाचे असते. 



ओबीसीची नाळ ब्राम्हणांनी ओळखली असल्यामुळेच आपण ओबीसी समाजाचे लोक त्यांच्या जाळ्यात अडकतो. म्हणजे कळत न कळत आपण गुलामीगिरीत अडकतो याचा विचार करणे गरजेचे आहे.वैचारिक दृष्टीने विचार करा आणि काल्पनिक गोष्टीवर विश्‍वास ठेऊन अंधभक्त होऊन स्वतःची फसवणूक टाळा.हाच ओबीसी समाजाच्या समस्या आणि त्यावरील उपाय आहे.



वैचारिक सिद्धांत,वैज्ञानिक सिद्धांत म्हणजे कर्म करा मेहनत करा.सत्यनिष्ठ परिस्थितीचा विचार करुन अडचणीवर मार्ग काढून मात करा.या बाबतीत ज्यांची श्रध्दा असेल त्यांच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही ज्यांना पटेल त्यांनी विचार करून चर्चा करावी.म्हणजेच ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी उपाय शोधता येतील.


ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी संविधानाशिवाय पर्याय नाही. ओबीसीला शासन दरबारी काही अधिकार हक्काची मागणी करायची असेल तर त्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संवैधानिक पद्धतीने आंदोलन करावे लागेल. त्या ठिकाणी भटा ब्राम्हणांच्या सांगण्यावरून  एखादी सत्यनारायण पुजा,कर्मकांड,होमहवन,कर्मकांड,धार्मिक कथा पारायण,कथा वाचन करून कोणता ही न्याय,हक्क,अधिकार मिळणार नाही. त्याचा आर्थिकदृष्ट्या फायदा फक्त आणि फक्त ब्राम्हणांना होईल. ओबीसीना नाही.


सरकार आपल्या ओबीसी समाजाच्या कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही मागण्या समाजाच्या उन्नतीसाठी कधीच मान्य करणार नाही. हे संविधान सत्य आहे. कारण मागितल्याने मिळत नाही आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही. हे ओबीसी समाजाने कायम लक्षात घेतले पाहिजे. विशेष करून ओबीसी समाजातील सर्व सामाजिक संस्था,संघटना,आणि राजकीय पक्षात कार्यरत असलेल्या नेत्यांनी लक्षात ठेवावे. 



धार्मिकता ही वैयक्तिक पातळीवर असावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे.समाज कोणताही असो त्या त्या सामाजिक सर्वांगीण विकासासाठी सरकार दरबारी विविध प्रकारच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले संविधान न्याय,हक्क,अधिकार मिळवून देऊ शकते.ओबीसी समाजाच्या समस्या आणि उपाय संविधानाशिवाय दुसरा मार्ग नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.शेवटी एकच सांगावेसे वाटते की,काल्पनिक, पाखंडवाद,अंधश्रद्धा इत्यादी गोष्टी दूर करून सत्यात व वास्तवात असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले भारतीय संविधानाचा स्वीकार करा.


आपल्या बहुजन महापुरुषांचे समाजहित विचार आत्मसात करा,क्रांतिकारी विचारांचे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा ब्राह्मणी पाखंडवादा विरुध्द संघर्ष केलेला होता. आणि त्यांनी काल्पनिक कथा,पाखंडवाद, ब्राह्मणवाद,अंधश्रध्दा दूर करून निसर्गनिर्मितीला प्राधान्य दिले.अशी सत्याची शिकवण सत्याचा संदेश बहुजन समाजाला महात्मा फुलेंनी दिलेला आहे.



ओबीसी समस्या सोडविण्याचा उपाय त्यांनी त्यावेळी दिला आहे.अज्ञान अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शिक्षण घ्या, ते घेतले तर समस्या सोडविण्याची वैचारिक,मानसिक संघशक्ती तुमच्यात आल्याशिवाय राहणार नाही. ती आपण ओबीसीनी आजपर्यंत स्वीकारली नाही. याचा आपण ओबीसीनी विचार करणे गरजेचे आहे.बघा! वाचा आवडल्यास चर्चा करा. मार्ग काढूनच समस्या सुटू शकतात आणि उपाय सुचतात. महात्मा फुलेंनी शंभर वर्षापूर्वी सत्य लिहण्याचे धाडस केले.म्हणून मी तर खूप लहान आहे.लहान तोंडी मोठा घास म्हणूनच माफी असावी.पण.....?.चर्चा,संवाद,वाद विवाद झाला तरच!
 
प्रमोद सुर्यवंशी
८६०५५६९५२१

Post a Comment

Previous Post Next Post