महत्वाची .... भागवत कथा नाही .... मिळू द्या गरिबांना शिक्षण ..

भागवत कथेच्या पाखंडपणासाठी शाळा बंद:

शैक्षणिक नुकसान झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
भाविकांसाठी प्राथमिक शाळेला बनवले स्वयंपाकघर आणि कथेचा पाखंडपणा सांगणार्‍या ब्राम्हणांसाठी अंगणवाडी केंद्रात वातानुकुलित विश्रामगृह,मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील प्रकार, मंत्र्यांनी फेटाळला आरोप


मध्य प्रदेश: भागवत कथेच्या पाखंडपणासाठी आठवडाभरासाठी शाळा बंद ठेवल्याने शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर त्या शाळेला येणार्‍या भाविकांसाठी स्वयंपाकघर व भागवत कथेचा पाखंडपणा सांगणार्‍या ब्राम्हणांसाठी अंगणवाडी केंद्रात वातानुकुलित विश्रामगृह बनवण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला असून राज्यमंत्री सुरेश धाकड यांनी हा आरोप फेटाळला आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, राज्यमंत्री सुरेश धाकड यांच्या मदतीने एका मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भागवत कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि गावातील प्राथमिक शाळेतच लोकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या धार्मिक कार्यक्रमासाठी आठवडाभर त्यांचे वर्ग बंद ठेवण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 
शाळेच्या परिसराचा वापर भाविकांसाठी भोजन आणि प्रसाद बनवण्यासाठी केला जात होता. काही वर्गखोल्या स्वयंपाकासाठी आणि मिनरल वॉटरच्या बाटल्या ठेवण्यासाठी वापरल्या जात होत्या. इतर वर्गखोल्यांचा वापर जेवण बनवण्याच्या कामात गुंतलेल्या महिलांसाठी विश्रांतीची जागा म्हणून केला जात होता.
एका अंगणवाडी केंद्राचे एका धार्मिक नेत्यासाठी तात्पुरत्या विश्रामगृहात आणि भागवत कथा सांगणार्‍या पंडितांसाठी वातानुकूलित खोलीत रूपांतर करण्यात आल्याची माहिती आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
स्थानिक भाजप आमदार आणि राज्यमंत्री सुरेश धाकड राथखेडा यांनी वर्ग विस्कळीत झाल्याचे नाकारले. ते म्हणाले, कोण म्हणतं शाळा बंद आहे? ती खुली आहे. ज्या ठिकाणी भागवत कथा होणार आहे ते ठिकाण शाळेच्या जवळ नाही, त्यामुळे कथेचा शाळेच्या कामकाजावर कसा परिणाम होऊ शकतो.
लाली आणि संगम या इयत्ता चौथीच्या दोन विद्यार्थ्यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, शाळेत तंबू लावण्यात आल्यापासून वर्ग सुरूच नाहीत. स्वयंपाकासाठी शाळेच्या बाहेरच मंडप लावण्यात आला आहे. स्थानिक रहिवासी सूरज सिंग यांनी सांगितले की शाळेच्या आवारात भाविकांसाठी भोजन तयार केले जात असल्याने प्राथमिक शाळेतील वर्ग विस्कळीत झाले आहेत. राज्यमंत्री हे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे निकटवर्तीय मानले जातात.
-०-

Post a Comment

Previous Post Next Post