मजेवाडा कुपाचे काम उत्तम व समाधान कारक गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डा किशोर मानकर याची मजेवाडा कुपकामास भेट देऊन तपासणी


 आरमोरी -  वनविभागाच्या वतीने जंगल कामगार सस्थाना कुपकामातुन सभासदांना रोजगार उपलब्ध करून सस्थाना उत्पनात वाढ करण्याच्या डुटिने वनविभाग महत्वाचा दुवा असल्यामुळे गडचिरोली वनवृत्ताचे वनसरक्षक डॉ  किशोर मानकर  यांनी वडसा वनविभागातील आरमोरी वनपरिक्षेत्रात दौरा करून   विविध कामावर भेट देऊन तपासणी केली. प्रामुख्याने जंगल डेपो मंजेवाडा येथील श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेला कटाईचे काम असलेल्या कुप  नंबर दहाची तपासणी केली. व कुपाचे काम उत्तम व समाधान कारक असल्याचे सांगीतले.

 दिनांक 2/4/022 ला वडसा वनविभागात दौर्‍यावर असलेले गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डाॅ किशोर मानकर सर व वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मविर सालविठ्ठल   यांनी आरमोरी वनपरिक्षेत्रात दौरा करून पळसगांव वन परिमंडळातील कूप क्र.10 मंजेवाडा क्षेत्र 104हें.कुप कटाई  चे कामाची तपासणी केली पहाणी करताना त्यांनी मार्किंग नुसार झाडे कटाई केली आहेत की नाही हे उपलब्ध मार्किंग बुक वरून तपासुन पाहिले कूप डेपोत वाहतुक झालेला माल डेपो रजिस्टर नुसार बरोबर आहे की नाही हे ही तपासुन पाहिले व वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम आरमारी यांनी कुपात इमारत माल फार्मफॅक्टर चे अनुमानाने जास्त निघाला असल्याचे निदर्शनात आणून दिले त्यावेळी त्यांनी त्याचे कारण काय हे शोधून  तसा अहवाल तयार करून सादर करणेस व  वनपरीक्षेत्र अधिकारी यांना सुचविले त्यावेळी पळसगाव  क्षेत्र सहाय्यक गाजी शेख   यांनी कुपाचे मार्कींग करताना रोगड झाडे हे जलाऊ मध्ये समाविष्ट केल्याचे सांगितले परंतू त्या प्रत्येक झाडांमधुन एक ना एक इमारत नग निघालेला आहे त्यामुळे ईमारती माल जास्त निघाले असल्याचे पटवून सांगीतले व तसे कुपात कटाई केलेले झाडे प्रत्यक्षात  दाखवून त्यांचे समाधान करून दिले.कुपात कटाई केलेला व कुप डेपोत वाहतूक झालेला माल वाहतुक कंत्राटदाराला दिलेल्या मुदतीत विक्री डेपोला वाहतुक करणेस सुचविले अशा सुचना उपवनसंरक्षक वडसा व वनपरीक्षेत्र अधिकारी आरमोरी  यांना दिले. व  श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेच्या कुपाचे काम उत्तम व समाधान कारक असल्याचे सांगीतले. यावेळी  श्री.गुरूदेव जंगल कामगार संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम आरमोरीचे वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम  पळसगाव परीमडळ क्षेत्र सहायक  एम गाजी़ शेख मजेवाडा कूप एजंट वनरक्षक दिगांबर गेडाम श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे कर्मचारी शरद मडावी दिवाकर राऊत वेलेस मसराम सुनिल कुमरे  प्रामुख्याने उपस्थीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post