मुंडके शरीरापासून वेगळे हत्या झालेल्या तरुणीची अखेर ओळख पटली

चंद्रपूर - 4 एप्रिलला भद्रावती येथे 22 वर्षीय युवतीचे शीर नसलेला मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती.

कोणीतरी अज्ञात इसमाने सदर युवतीचा खुन करून तिची ओळख पटू नये म्हणुन तिचे मुंडके शरीरापासुन वेगळे करून तिचे मृत शरीर निर्वस्त्र अवस्थेत ठेवले यावरून पोलीस स्टेशन भद्रावती येथे अज्ञात इसमांविरुध्द अपराध क्रमांक १४१/२०२२ कलम ३०२ , २०१ भादंविचा गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर घटनास्थळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तात्काळ भेट देवून मृतदेहाचे परिसराची पाहणी केली. मृतदेह निर्जनस्थळी मुंडके नसलेल्या नग्न अवस्थेत होता आरोपीने मयताची ओळख पटू नये म्हणुन तिचा शिर कापुन नेले तसेच कपडे सुध्दा काढुन घेवुन गेला अशा अवस्थेत कोणत्याही प्रकारचे पुरावे / खुणा / निशानी नसल्यामुळे सदर मृत महिलेची ओळख पटविणे पोलीसांसमोर आव्हाण होते. स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व पथक तसेच सायबर सेल मधील सायबर एक्सपर्ट यांचे मार्फतीने मृत महिलेच्या शरीरावरील खुणा, मृत देहाजवळ मिळालेल्या तिच्या वापराच्या वस्तु ईत्यादि शोध पत्रिका तयार करून शोध घेण्यात आला. तसेच चंद्रपूर व बाजुच्या सर्व जिल्हयातुन या वयाच्या हरवलेल्या / पळुन गेलेल्या मुलींच्या शहानिशा केली परंतु उपयुक्त माहिती मिळुन आली नाही घटना घडुन काही दिवस होवुन हरवल्याची तक्रार प्राप्त झाली नाही त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी तांत्रीक तपास केला तसेच गोपनिय माहिती मिळविण्याचा अहोरात्र प्रयत्न केला त्यामध्ये पोलीसांना यश आले. Headless dead body
गोपनिय माहितीदाराकडुन सदर महिलेचे ओळख पटविण्यात आली तिचा मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आला त्यावरुन तिच्या राहते घराचा रामटेक जिल्हा नागपूर येथील पत्ता प्राप्त झाला त्यावरून तिची मोठी बहीण हिच्याशी संपर्क साधुन ओळख पटविण्याची खात्री करण्यात आली. तिच्या बहीणीने तिच्या शरीरावरील वर्ण व वापरातील वस्तु पाहुन मृत महिला ही तिची बहीण असल्याची खात्री केली. सदर खुनातील आरोपी शोधण्याचे स्थानिक गुन्हे शाखा तसेच भद्रावती पोलीस स्टेशन, सायबर सेल चे विविध पथक पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात तपास करीत आहेत.
या प्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून लवकरचं या आव्हानात्मक गुन्ह्याचा पर्दाफाश होणार अशी माहिती आहे.
सदर युवतीला एका ठिकाणी खून करीत तिचे शीर कापण्यात आले, नंतर त्या युवतीचा मृतदेह भद्रावती येथे टाकून आरोपी पसार झाले अशी माहिती आहे.

मयत मृतदेहाची ओळख पटविण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि संदीप कापडे, पोउपनि अतुल कावळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार व सायबर सेल चे cyber Expert मुजावर अली, वैभव पत्तीवार, राहुल पोंदे, भास्कर चिंचवलकर , संतोष पानघाटे व उमेश रोडे यांनी केली .

Post a Comment

Previous Post Next Post