ब्राम्हणवादी संघटनेने मुस्लिमाच्या घराला लावली आग आंतरजातीय विवाहाचा बाऊ, आग्रा येथील धक्कादायक घटना

आंतरजातीय विवाहाचा बाऊ करत ब्राम्हणवादी संघटनेने मुस्लिमाच्या घराला लावली आग लावण्याचा धक्कादायक घटना आग्रा येथे समोर आली आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी एका हिंदू मुलीचे अपहरण केल्याचा आरोप असलेल्या मुस्लिमाची दोन घरे जाळली. मात्र,  त्या मुलीने नंतर एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, ती या व्यक्तीसोबत तिच्या इच्छेने गेली होती. परिणामी घरांना आग लावणार्‍या ब्राम्हणवादी संघटना तोंडावर आपटली आहे. 
याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. १५ एप्रिल रोजी धर्म जागरण समन्वय संघ नावाच्या ब्राम्हणी गटाच्या सदस्यांनी हा हल्ला केला होता. या घटनेबाबत निष्काळजीपणामुळे एका पोलीस चौकीच्या प्रभारीला निलंबित करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रभारींच्या विरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
 आग्रा येथील रुंकटा भागात जिम मालक साजिद ज्या घरात राहत होते ते घर जमावाने पेटवून दिले. या कुटुंबाला लागून असलेले आणखी एक घरही जळाले.मात्र, साजिदचा भाऊ मुजाहिद आणि काका रईस यांच्या घरांनाही आग लावण्यात आल्याचे टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले आहे.साजिदच्या घरावर झालेल्या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अल्ट न्यूजचे पत्रकार मोहम्मद जुबेर यांनी ट्विट केले की, धमक्या मिळाल्यानंतर सज्जाद आणि त्यांचे कुटुंबीय घर सोडून गेले आहेत. त्यामुळेच त्या घरांना आग लागली तेव्हा घरात कोणीच नव्हते.यापूर्वी ब्राम्हणवादी संघटनेचा जमाव एका हिंदू मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी साजिदला अटक करण्याची मागणी करत होता. दरम्यान, रुंकटा बाजारातील दुकानेही बंद ठेवण्यात आली असून, व्यापार्‍यांनीही साजिदला अटक करण्याची मागणी केली आहे.
दुसरीकडे, पोलिसांचे म्हणणे आहे की ही मुलगी २२ वर्षांची असली तरी ती अजूनही शाळेत आहे. मात्र, वृत्तानुसार, मुलीच्या वडिलांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांची मुलगी मथुरा येथील एका महाविद्यालयात बीएची विद्यार्थिनी आहे.मुलीच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती, त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याच वेळी, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती मुलगी आपण प्रौढ आहे आणि आपण स्वत: च्या इच्छेने साजिदसोबत गेली असे म्हणताना ऐकू येते. आग्राचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुधीर कुमार सिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, दोघेही प्रौढ आहेत.पोलीस त्या मुलीला न्यायालयात हजर करतील, मात्र न्यायालयांना सुटी असल्याने अद्याप हजर करता आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post