मागील काही दिवसांपासून रामाळा मुख्य मार्गावर कोसळलेल्या झाडाचा वाली 'कोण'? - संबंधित विभाग वाहनधारकांच्या जीवावर उठले की काय?

सत्यवान रामटेके(उपसंपादक)
"सुपरफास्ट न्यूज"
आरमोरी:-  तालुका मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या रामाळा गावानजीक स्मशानभूमी लगत गेली चार ते पाच दिवसांपासून मुख्य डांबरी मार्गावर भला मोठा झाड कोसळून सायकलस्वार,दुचाकी, चारचाकी वाहने व इतर वाहन धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याने सर्व नजरेसमोर दिसूनही संबंधित विभाग वाहनधारकांच्या जीवावर उठले की काय?असा प्रश्न निर्माण झाला असल्याने मुख्य मार्गावर कोसळलेल्या झाडाचा वाली कोण?
आरमोरी पासून रामाळा ते वैरागड मार्गे अनेक सर्वसामान्य नागरिक व वाहनधारकांची रेलचेल सुरू असते.मात्र गेली चार ते पाच दिवसांपासून मुख्य मार्गावर कोसळलेल्या झाडामुळे मुख्य रस्ता सोडून सर्वच जण रस्त्याच्या कडेला रेती व माती
असलेल्या मार्गावरून आवगमन करीत असल्याने एखादेवेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने मुख्य मार्गावर कोसळलेल्या झाडाचा संबंधित विभागाने दखल घेऊन विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याचे दिसून येते.

Post a Comment

Previous Post Next Post