दारूच्या तालात पत्नीला मारहाण

गोंदिया : शहराच्या गौतमनगर बाजेपाई वॉर्डातील ज्योती अनिल शहारे (३३) यांना आरोपी पती अनिल शोभाराम शहारे (३४), रा. रिसामा, ता. आमगाव याने मद्याच्या धुंदीत ७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता मला आपल्या भावाजवळ का ठेवत नाही म्हणून ज्योतीला थापडबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post