*अनिकेत समाजकार्य महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांद्वारे ग्राम कुरुड येथे स्वछता अभियान व जनजागृती कार्यक्रम*

कुरुड:- तसमाजकार्य महाविद्यालय देसाईगंज वडसा येथील विद्यार्थीनी यांनी ग्रामपंचायत कार्यालय कुरूड ता. देसाईगंज (वडसा) समोरील  परिसर स्वच्छ करीत स्वच्छतेचा संदेश दिला.                                            ग्रामपंचायत कार्यालय (आदिवासी समुदाय ) कुरूड येथे 09 दिवस अनिकेत समाजकार्य महाविदयालयच्या विद्यार्थीनी यांनी आदिवासी समुदायातील क्षेत्रकार्य करीत असतांना साफसफाई व समाजप्रबोधन केले. आज कार्यक्षेत्राचा निरोप समारंभ  कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी सरपंच सौं प्रशाला गेडाम, ग्रामविकास अधिकारी श्री.संजय चलाख, प्राध्यापक भागडकर सर,प्राध्यापक वालदे सर उपस्थित होते.. निरोप समारंभात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांचे विशेष आभार मानले. सदर कार्यक्षेत्रात निकीता लेंडे , वैष्णवी बगमारे, पल्लवी ढोंगे, वंदना चिमणकर, आचल खोब्रागडे, भूमिका मस्के, नैना सहारे, रीना धोटे यांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post