सुनेच्या मारहाणीत.... सासऱ्याचा मृत्यू

पाचोरा:- माहेरी पाठविण्यास नकार दिल्याने सून व तिच्या वडिलांनी जावई, सासरा व सासू अशा तीन जणांना गुंगीचे औषध देऊन मारहाण केली होती. बचावलेल्या सासऱ्याचा शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सुनेने केलेल्या मारहाणीमुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलगा राहुल पाटील याने केला आहे. परंतु याबाबत पोलिसांत कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही. शहरातील कोंडवाडा गल्लीत राहणारे अर्जुन उखा पाटील यांचा मुलगा राहुल याचा विवाह दलालामार्फत २५ मार्च २०२२ रोजी परभणी जिल्ह्यातील मुलीशी झाला. ही मुलगी अल्पवयीन असून, तिचा हा चौथा विवाह आहे. विवाहानंतर ही मुलगी पाचोरा येथे आली. सासरी करमत नसल्याने तिने वडिलांना बोलावून घेतले. आपण मलीला माहेरी घेऊन जातो असे तिच्यावडिलांनी सासऱ्यास सांगितले. यावर सासरे अर्जुन पाटील यांनी सुनेस माहेरी पाठविण्यास नकार दिला. याचा राग येऊन सुनेने पती, सासू सासरे यांना गुंगीचे औषध दिले. यानंतर सून व तिच्या बापाने लोखंडी गजाने पती राहुल, सासरा अर्जुन पाटील व सासू विजयाबाई यांना बेदम मारहाण केली. रात्री अर्जुन पाटील यांना जाग आल्याने त्यांनी मुलगा व पत्नीची सुटका केली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर सुनेला पोलिसांनी ताब्यात घेत तिची जळगावच्या सुधारगृहात रवानगी केली, तर बाप सध्या जिल्हा कारागृहात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post