बायको गेली पळून परत येताच नवऱ्याने दिली अशी शिक्षा ! ऐकून उडेल थरकाप

मध्य प्रदेश:-पतीला न सांगता सहा दिवसांपासून घरातून गायब झाल्याच्या कारणातून एका पतीने आपल्या पत्नीचं नाक कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला सहा दिवसांनतर आपल्या घरी परतल्यानंतर, पतीने अमानुषतेचा कळस गाठत आपल्या पत्नीचं धारदार चा’कु’ने नाक कापलं आहे.

ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं बैराड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गु-हा दाखल करत नराधम पतीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे,


संबंधित घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील बैराडमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला गेल्या सहा दिवसांपासून आपल्या पतीला न विचारता घराबाहेर गेली होती. सहा दिवसानंतर पीडित महिला घरी आली असता, आरोपी पतीनं तिला बेदम मा र’ हाण केली आहे. तसेच त्याने ‘कुठे गेली होतीस?’ अशी विचारणा केली.

पण पत्नीला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यामुळे संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीचं चक्क नाकच कापलं आहे.तसेच घटनेची तक्रार पोलिसांकडे दिली तर जिवे मारण्याची धमकीही तिच्या पतीने दिली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत पतीने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी पतीच्या या धक्कादायक कृत्यानंतर पीडित महिलेनं बैराड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी खु नाच्या प्रयत्नासह अन्य कलमाअंतर्गत गुन्-हा दाखल केला आहे. गु न्’-हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी पती बंटी जाटव याला बेड्या ठोकल्या आहेत.बैराड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अरविंद चौहान यांनी याबाबत माहिती देताना म्हटलंय की, 6 दिवसांपूर्वी आरोपी बंटी जाटवची पत्नी त्याला माहिती न देता घरातून निघून गेली होती.ती घरी परत आल्यानंतर पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत हे कृत्य केलं आहे. पोलिसांनी आरोपी पती बंटीला अट’क केली असून पुढील तपास सुरू आहे

Post a Comment

Previous Post Next Post