अन् झोपेतच त्याच्यावर केला बिबट्याने हल्ला

वासेरा : ताडोबाच्या बफरझोनक्षेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत खातेरा गावात रात्रीला बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला. मोहन मसराम (६१) हे झोपेत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवून जखमी केले. ही घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. नेहमीप्रमाणे मोहन मसराम हे स्वतःच्या घरी अंगणात झोपले होते. बिबट्याने अंगणात येऊन त्यांच्यावर हल्ला चढविला. यात त्यांना बिबट्याच्या नखाच्या जखमा झाल्या आहेत. यानंतर बिबट्याने गावात फेरफटका मारून धुमाकूळ घातला. खातेरा हे गाव जंगलाला लागून आहे.

Post a Comment

Previous Post Next Post