जनतेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध ... 'शिवसेना संपर्क प्रमुख मा .किशोर पोतदार साहेब यांचे प्रतिपादन


गडचिरोली :- तालुक्यातील टेंभा व मौशिचक येथे शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या पुढाकाराने शिवसंपर्क अभियान .....


छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श जोपासुन जनतेच्या कल्याणासाठी शिवसेनेची वाटचाल सुरु आहे . समाजसेवा व जनतेचे प्रश्न सोडवुन न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कार्यरत आहे . जनतेनी शिवसेनेच्या विचारधारेशी जुळुन सेवेची संधी द्यावी . शिवसेना सदैव जनतेच्या विकासासाठी कटिबध्द राहील असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख मा . किशोर पोतदार साहेब यांनी केले . गडचिरोली तालुक्यातील टेंभा व मौशिचक येथे शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री . अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या पुढाकाराने शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन ते बोलत होते . यानंतर मार्गदर्शन करतांना शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले राज्याच्या जनतेने शिवसेनेला जनतेच्या विकासाची संधी दिली आहे . शिवसेना पक्ष प्रमुख मा . उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या रुपाने मा . मुख्यमंत्री म्हणुन राज्याला विकासपुरुष लाभलेले आहे . मा . श्री . उध्दवजी ठाकरे साहेबांनी शेतकरी , कामगार व गोर गरीबांच्या विकासाला प्राधान्य देऊन समाजातील दुर्बल घटकांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. विविध कल्याणकारी योजना राबवुन त्याचा जनतेला लाभ देण्यात येत आहे . जनतेनी राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री . अरविंदभाऊ कात्रटवार यांनी याप्रसंगी केले .


 या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख मा . किशोर पोतदार साहेब , सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री . अरविंदभाऊ कात्रटवार , सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे , जिल्हाप्रमुख वासुदेवजी शेडमाके , जिल्हा संघटक विलास ठोंबरे , शिवसेना चामोर्शी (ग्रामीण) तालुका प्रमुख पप्पी पठाण , चामोर्शी शहर तालुका प्रमुख अमित यासलवार , उपतालुकाप्रमुख यादवजी लोहंबरे,स्वप्निल खांडरे,संदीप भुरसे,निकेश लोहबरे, राहुल सोरते,अमित बानबले , दिलीप चनेकार , तुलाराम मुनघाटे , हरीश बानबले , तानाजी आतबले , मुकेश नैताम , राकेश मुनघाटे , भोजराज धकाते , रुपेश बानबले , भगवान चणेकार , रेमाजी मुनघाटे , नाना चुधरी , अंबादास मुनघाटे , माणिक वाघाडे , राकेश चिंचोलकर , किशोर देशमुख , विनोद सयाम , चरण देशमुख , प्रकाश तुराटे , जगन्नाथ ठाकरे , गोपाल हुलके , राजेंद्र शिडाम , महेश तिवाडे , गिरीधर निलेकार , सत्यवान कोहपरे , जगदीश सालोटकर , संजय उसेंडी , अरुण बुरेवार , अनंत हुलके , उमाकांत ठाकरे यासह टेंभा व मौशिचक येथील शेकडो माता भगिनी , गावकरी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते


Post a Comment

Previous Post Next Post