10 वी बोर्डाच्या उत्तर पत्रिका केल्या परत


कोरची  :- महाराष्ट्र राज्य कायम विना  अनुदानित कृती समीत्तीच्या आदेशावरुन दहावी बोर्ड परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासनीवर बहीष्कार करण्यात आला.
दि 01एप्रील 2022 ला राष्ट्रीय विद्यालय बिहीटेकला तह. कोरची जि.गडचिरोली मध्ये दहावी बोर्डाच्या उत्तर पत्रिका उलट टपाली परत केल्या. 

कृती समीतीच्या माध्यमातून अनेकदा आंदोलन करुन शासनाने विनाअनुदानित शाळेकडे लक्ष दिले नाही. आता शासनाचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी इयत्ता दहावी चे उत्तर पत्रिका शाळेत तपासनीसाठी आले असता शाळेतील शिक्षकांनी कृती समीतीच्या आदेशावरून पेपर तपासन्यास नकार दिला. व पेपर गट्टा परत पाठविला. 

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भारत डोंगरे तसेच स. शी. तथा कायम विनाअनुदानित कृती समीती कोरचि तालुका अध्यक्ष श्री M.S.कवाडकर सर तथा श्री. खोबागडे सर, कु. फुलकुवंर मॅडम व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री .आर आर .बेरूगवार . श्री. जेंगठे, श्री. गौरकर, श्री. सोरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post