कृषिपंपाना आठ तास वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ठाणेगाव टी पॉइंटवर शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन* *३९ आंदोलनकर्त्यांना अटक व सुटका*


आरमोरी-आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा विद्युत भारनियमातील ८ तास वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा,कृषिपंपांची रिडींग करूनच बिले देण्यात यावी,तालुक्यातील प्रलंबीत कृषिपंपासाठी गेल्या४ वर्षांपासून डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन देण्यात यावे,भारनियमामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ३५ हजार रुपये मोबदला देण्यात यावा आदि विविध मागण्यांसाठी शेतकरी हक्क संघर्ष समिती अरमोरीच्या वतीने ठाणेगाव येथील टी पॉइंटवर आज  चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 
 या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी काँग्रेसचे सचिव दिलीप घोडाम,प्रहार संघटनेचे अध्यक्ष निखिल धार्मिक,माकपाचे माजी जि. प.सदस्य अमोल मारकवार यांनी केले.
 
आज सकाळी १० वाजता आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव, डोंगरगाव, वणखी, वासाळा, सायगाव,शिवणी,लोहारा, कोजबी, करपडा, सिर्सी, रवी,या गावातील शेतकरी आपल्या रास्त मागण्यांसाठी ठाणेगाव येथील टी पॉइंटवर जमा झाले.व शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना ८ तास वीज पुरवठा झालाच पाहिजे अशी नारेबाजी करून आणखी आंदोलन तीव्र केले.यावेळी आंदोलन कर्त्यांनी जो पर्यंत वीज वितरण विभागाचे अधिकारी आंदोलन स्थळी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यानंतर गडचिरोली येथील कार्यकारी अभियंता डोंगरवार, आरमोरी येथील वीज वितरण कार्यालयाचे उपविभागीय अभियंता बोबडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.  यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनि कर्ज,उसनवार घेऊन उन्हाळी धानपिक बोरवेल,विहीर, नदी व नाल्यावर कृषिपंप वीज जोडणी करून, कृषिपंपाच्या साहाय्याने धान पेरणी करून रोवणीचे काम पूर्ण केले असता काही दिवसातच शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता  सरसकट कृषिपंपासाठी आठ तास भारनियमन सुरू केल्याने यातही कित्येक शेतकऱ्यांना पाण्याअभावी धानपिक करपल्याने नुकसान सोसावे लागत आहे.त्यातही आठ तासांपैकी केवळ दोन तास  फक्त  कृषिपंपांना वीजपुरवठा मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतांना पुरेसा पाणी होत नाही.तरी शासनाच्या आदेशानुसार आठ तास पाणी पुरवठा करावा .परंतु वीज वितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांनी त्यांचे प्रश्नांना कोणतेही उत्तर न दिल्याने व आंदोलनकर्त्यांच्या कुठल्याही समस्या जाणून न घेता निघून गेल्याने आंदोलनकर्ते चिडून जाऊन आरमोरी-गडचिरोली रोडवर तब्बल अर्धा तास चक्काजाम आंदोलन केले.त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली होती.आंदोलन कर्त्यांचे आंदोलन आणखी चिघळू नये म्हणून, आरमोरी पोलिसांनी ३९ शेतकऱ्यांना अटक करून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.व नंतर त्यांची सुटका करण्यात आली.शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना आठ तास वीज पुरवठा न झाल्यास आणखी आंदोलन करण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
 
या आंदोलनात आदिवासी काँग्रेसचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम,प्रहारचे निखिल धार्मिक,शेखर धंदरे, माकपचे अमोल मारकवार, माजी पंचायत समिती सदस्या वृन्दाताई गजभिये,सुरेश चापळे,अभिषेक चापले,शामराव नंदरधने,पुंडलिक मानागडे, श्रीराम मेश्राम,अरुण चापडे , प्रल्हाद मरसकोल्हे, प्रकाश मेहरे, राजू सातपुते, आदेश मुरांडे ,राजेंद्र डोंगे, संजय लोथे, महादेव चौधरी, पिंटू बांनबले, किशोर भोयर, चंद्रशेखर धंदरे, दीपक बांनबले, लीलाधर निंबोळ, संतोष सेलोटे, जगदीश पेंदाम, मुखरू बावनकर, विलास जुमनाके, विनोद उसेंडी ,योगेश पिंपळे, लोचन मडावी, रामेश्वर नरुले, सुधीर ठाकरे, अशोक नरुले गोपाळ ढोरे, हरिचंद्र राऊत, भैय्याजी खरकाटे यासहित शेकडो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post