रेगुंठा येथील डॉ.जगदीश वेन्नम यांना शिक्षण सम्राट म.ज्योतीबा फुले राष्ट्रीय गौरव पुरस्कार

अहेरी:- सिरोंचा तालुक्यातील अति दुर्गम नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील रेगुंठा येथील डॉ।जगदीश वेण्णम यांना एकता फाऊंडेशन भारत संस्था च्या वतीने शिक्षण सम्राट महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२२ ने सन्मानित केले.
   डॉ.जगदीश वेन्नम यांचे अतिदुर्गम भागात करत असलेल्या सामाजिक कार्य व शोसल मीडिया न्युज कार्याची दखल घेत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.या पूर्वी याच संस्थेने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय सम्मान देऊन गौरविण्यात आले आणि कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी ने मानद डॉक्टरेट पदवी बहाल करून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
  डॉ.जगदीश वेन्नम यांच्यावर अनेकांचे शुभेच्छाचे वर्षाव होत आहे.आपल्या जीवनात अनेक पुरस्कार संपादन केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post