अन् महिलांनी दारूच्या पेटीसह मोटारसायकलही पेटवली...

अकोला:- गेल्या अनेक महिन्यांपासून अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील ग्राम भंडारज बु. या गावातील दोन ते तिन व्यक्तींकडून अवैधरीत्या दारू विक्रीचा व्यवसाय केला जात होता.

यासंदर्भात संबंधित विभाग आणि पोलीस विभागाला अनेक निवेदन आणि महिलांकडून मोर्चे पुकारले गेले. मात्र, स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे गावातील संतप्त महिलांनी आक्रमक भूमिका घेतली.

शनिवारी रात्री भंडारज या गावात दारू विक्रेत्यांवर हल्लाबोल करीत अवैध दारू विक्रेत्यांना रंगेहात पकडले.

तर मोटरसायकलद्वारे दारूची वाहतूक करणाऱ्यालाही पकडले. त्यानंतर त्याच्याकडे असलेली दुचाकी आणि दारुची पेटी पेटवून दिली. दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post