एससी, एसटी, ओबीसीला धर्म जागरणाच्या नावाने गुंडाळण्याचे आरएसएसचे षड्यंत्र बामसेफने केलेल्या जागृतीमुळे पायाखालची सरकली वाळू, हरिद्वारमधील चिंतन बैठकीत चिंता

हरिद्वार: देशात दिवसेंदिवस एससी, एसटी, ओबीसी व मुस्लिमांना जागृत करण्याचे काम बामसेफच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे हे लोक बामसेफकडे वळत आहेत. याच जागृतीला घाबरून आरएसएसच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी गावोगावी शाखा आणि एससी, एसटी, ओबीसीला धर्म जागरणाच्या नावाने गुंडाळण्याचे षड्यंत्र आखले आहे. यासंदर्भात हरिद्वारमधील चिंतन बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

आरएसएसची ही परिषद दक्षिण व उत्तर भारतात स्वतंत्रपणे सुरू आहे. त्यात प्रामुख्याने ५ मुद्यांवर चर्चा सुरू आहे. त्यात २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसह आरएसएसच्या २०२५ च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा अजेंडा आघाडीवर आहे.आरएसएसने आपले लक्ष्य गरीब वस्त्यांवर केंद्रीत केले आहे. या वस्त्यांवर नेहमीच धर्मांतरासाठी मिशनरींची नजर असते असा बागुलबुवा करण्यात आला आहे. 
आरएसएस आपल्या प्रमुख अजेंड्यावर लक्ष्य केंद्रीत करताना गो सेवा, धर्म जागरण मंचाची पुढील रणनितीही ठरवणार आहे. यात भाजपचे संघटन महामंत्री म्हणून जबाबदारी पार पाडणार्‍या प्रचारकांचे कार्यक्षेत्र बदलण्याच्या मुद्यावर भर देण्यात येणार आहे. या प्रकरणी एखादा ठोस निर्णय होणार किंवा नाही हे अद्याप स्पष्ट नाही. पण, ११ तारखेला याविषयीचे चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी लव्ह जिहाद व धर्मांतराचा मुद्दा केंद्रस्थानी होता. आरएसएस आता असे प्रकार रोखण्यासाठी धर्म जागरणाच्या मुद्याला धार देण्याचा प्रयत्न करत आहे. पण, हे काम सद्भावनेतून करण्याचा प्रयत्न केला जाईल. धर्मांतराच्या घटना रोखण्यासाठी आरएसएस अनु.जातीच्या वस्त्यांवर लक्ष्य केंद्रीत करणार आहे.
हरिद्वारच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत उत्तर प्रदेशातील सर्वच गावांत शाखा स्थापन करण्याच्या मुद्यावरही चर्चा झाली आहे. तत्पूर्वी, प्रांतवार शाखेत आरएसएसप्रमुख मोहन भागवत सहभागी झाले होते. आरएसएस २०२४ पर्यंत अवध क्षेत्रातील प्रत्येक गावांत आपली शाखा सुरू करण्याच्या प्रयत्नांत आहे. यासाठी त्यांनी एक खास रणनिती तयार केली आहे.
कुठल्या नावाने धर्म जागरण करणार?
आरएसएस ही ब्राम्हणांची संघटना आहे. हे ब्राम्हण एससी, एसटी, ओबीसीला हिंदू असे संबोधून आपल्या कळपात ओढताना दिसतात. परंतु केवळ ब्राम्हणच नव्हे तर एससी, एसटी, ओबीसीदेखील हिंदू नाहीत, हे ब्राम्हणांना चांगलेच माहित आहे. 

मात्र अशाप्रकारचा शब्दप्रयोग केल्याशिवाय त्यांचे राजकारण सफल होत नाही. म्हणून हिंदू धर्माचा टिळा लावूनच ते धर्म जागरण करणार हे कुणी सांगण्याची गरज नाही. मात्र अशा मायाजाळात आता एससी, एसटी, ओबीसी फसणार नाही एवढे मात्र निश्‍चित आहे. त्यामुळे आरएसएसच्या हातात तुरीच मिळतील यात शंका नाही.

Post a Comment

Previous Post Next Post