जिल्हाधिकाऱ्याने अपघात करून काढला पळ...

धुळे :- साक्री जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांच्या कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच करनवाल यांनी दुसऱ्या गाडीची व्यवस्था करत पळ काढला. मात्र, वेळीच मदत न मिळाल्याने दुचाकीस्वार जगन पिराजी मारनर यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे.शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. मीनल करनवाल या नंदुरबार येथे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. करनवाल या इनोव्हा कारने जात होत्या. त्याचवेळी कळंबीर गावाजवळ इनोव्हा कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चालक जगन मारनर हे जोरात रस्त्यावर कोसळले. घटना गंभीर असल्याचे पाहून करनवाल यांनी तातडीने साक्री आणि निजामपूर पोलिस स्टेशनला फोन केला

जिल्हाधकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करणे अपेक्षित असताना त्यांनी थेट पर्यायी वाहनाची व्यवस्था करुन अपघातस्थळ येथून पळ काढला. दरम्यान, वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्याने जगन मारनर यांचा मृत्यू झाला. या सर्व बाबीची गंभीर दखल मारनर यांच्या कुटुंबिय, नातेवाईक व नातेवाईक व ग्रामस्थांनी साक्री पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली

नातेवाईक व ग्रामस्थांनी साक्री पोलिस स्टेशन समोर म्हणजेच महामार्ग क्रमांक ६वर मारनर यांचा मृतदेह ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. अपघातातील दोषी करनवाल यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. आरोपीला अटक करण्याची ग्वाही पोलिसानी घेतली आणि मारनार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

Post a Comment

Previous Post Next Post