राकेश टिकैत पुन्हा शेतकरी आंदोलन छेडणार केंद्र सरकारला थेट इशारा


मुझफ्फरनगर : निवडणुकीपूर्वी शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनांचा सरकारला विसर पडला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आंदोलनासाठी सज्ज राहावे, आंदोलनाची तारीख अद्याप ठरलेली नाहीय. मात्र, तयारी पूर्ण झाली आहे असा इशारा भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला दिला आहे. मुझफ्फरनगरमध्ये ते बोलत होते.


केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे मागे घेण्याशिवाय आणखी अनेक आश्‍वासनं दिली. किमान आधारभूत किंमत हमी कायदा, रास्त दरात वीज, सिंचन यांसारखी आश्वासनं देण्यात आली होती. मात्र, आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण झालं नाही. त्यामुळं पुन्हा आंदोलन करण्याची भूमिका घेतलीय. 

या आंदोलनाची तारीख अद्याप ठरलेली नाही. परंतु, आंदोलनाची तयारी पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितले. दुसरीकडं किसान युनियनचे अध्यक्ष राजवीर सिंह जादौन यांनीही शेतकर्‍यांना संघटित होण्याचं आवाहन करत पुन्हा एकदा दीर्घ संघर्ष करावा लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post