संपकरी एसटी कर्मचार्‍यांनी २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू व्हावे मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश


राज्यातील एसटी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. येत्या २२ एप्रिलपर्यंत संपकारी कर्मचार्‍यांनी सेवेत रुजू होण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. तसेच कारवाई केलेल्या संपकारी कर्मचार्‍यांनासुद्धा पुन्हा सेवेत घेण्यास तयार असल्याची माहितीही राज्य सरकारने दिली आहे.


मागील पाच महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर आज सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचार्‍यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. तसेच कर्मचार्‍यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याबाबत आदेश देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. संपकारी कर्मचारी सेवेत रुजू होताना कर्मचार्‍यांनी पुन्हा असे होणार नाही, अशी समज देत सेवेत रुजू करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने एसटी महामंडळाला दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post