पंचशील बुध्द विहार रामनगर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती साजरी

गडचिरोली:- पंचशील बौध्द समाज मंडळ रामनगर गडचिरोली चे वतीने दिनांक ११ एप्रिल रोजी पंचशील बुध्द विहार रामनगर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली.त्या निमित्त " फुले आंबेडकर जयंती सोहळा" चे उद्घाटक व अध्यक्ष समाज मंडळाचे अध्यक्ष सुखदेव वासनिक हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डांगे सर , सिद्धार्थ गोवर्धन हे होते. सर्वप्रथम बुद्ध मूर्ती समोर दीप प्रज्वलित करून व म फुले , डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना हार अर्पण करून सोहळ्याचे उद्घघाटन करण्यात आले.त्यानंतर बुध्द वंदना झाल्यानंतर प्रास्ताविक मंडळाचे सचिव रुक्मानंद रामटेके यांनी केले तर मार्गदर्शन करताना सिद्धार्थ गोवर्धन यांनी म. फुले हे महिला साठी शाळा सुरू करणारे पहिले क्रांतिकारी , त्यांनी अस्पृश्य समाजा साठी शाळेची दार उघडी केली. सर्वांना समतेच्या छायेखाली आणून विषमता दूर केली. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे मोफत व सक्तीचे करण्यात यावे यासाठी हंटर कमिंशन पुढे निवेदन दिले. शेतकऱ्यांसाठी धरणे , कालवे बांधले म्हणून म.फुले हे समाज क्रांतीचे अग्रदूत आहेत असे मौलिक विचार मांडले. त्यानंतर प्रा. डांगे सरांनी म.फुले यांचे समाज कार्य व शिक्षण प्रणालीवर प्रकाश टाकला.डॉ. रायपुरे , नंदा खोब्रागडे अध्यक्ष ह्या प्र. अतिथी होते. संचालन तुरे सर यांनी तर आभार केशवजी शेंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोल्हटकर जी, मधुकर लोणारे, वानकर, डी. ए.मेश्राम यांनी तर त्रिषरान महीला मंडळाचे , सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post