*निशु:ल्क योगविज्ञान शिबीराची सुरूवात*

वणी
वणी : परशुराम पोटे

      भारत  स्वाभीमान ट्रस्ट वणी  व पतंजली योग समितीचे वतीने आज दिनांक 12 एप्रील ला जैताई मंदीर वणी येथील प्रांगणात नि:शुल्क योगविज्ञान शिबीराची सुरूवात झाली.
उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सभापती संजय पिंपळशेंडे, प्रा.महादेव खाडे, गटविकास अधिकारी मंदार मराठे, गटशिक्षणाधिकारी  नवनाथ देवतळे, गजानन विधाते
  इत्यादी सह जवळपास ९० योगसाधक उपस्थित होते. 
       योगशिक्षक तथा तज्ञ मार्गदर्शक इंजिनिअर संजय खोंडे यांनी शरीराची लवचिकता व  पचनशक्ती वाढविणे, शरीराची हाडे मजबुत ठेऊन रोगप्रतीकारशक्ती  कशी वाढावावी यासाठी शरीर संचलन, सुक्ष्म व्यायाम , सुर्यनमस्कार ईतर क्रियांवर  प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
त्याशिवाय भस्रीका, कपालभाती , अनुलोम विलोम, भ्रामरी ,उदगीथ व प्रणव ध्यान ई चे महत्त्व विषद करून प्राणायाम उपस्थितांकडून करवून घेतले. शेवटी सिंहगर्जना, हास्यासन व शांतीपाठ घेण्यात आला.
         प्रास्ताविकेतुन योगवर्गाची रूपरेषा प्रा. महादेव खाडे यांनी स्पष्ट केली. संचलन व परिचय लक्ष्मण इद्दे यांनी तर आभारप्रदर्शन सौ. विजयाताई दहेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी रमेश बोबडे, गुलाब निते,वसंत उपरे,सुधाकर गारघाटे,सुरेश बागळते,मायाताई माटे, लताताई थेरे,
 ईत्यदींनी कार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post