पोलिसांना धक्काबुक्की करून सरपंच झाला फरार

अहमदनगर:- गेल्या काही वर्षांपासून कायदा हातात घेण्याचे प्रमाण नागरिकांचे वाढलेले पाहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुका येथे अशीच एक घटना समोर आलेली असून यात्रेच्या दरम्यान सुरू असलेल्या तमाशाचा कार्यक्रम बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी उक्कलगावचे सरपंच नितीन आबासाहेब थोरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मंगळवारी पाच तारखेला खंडोबा चौकात ही घटना घडली होती गुन्हा दाखल झाल्याचे समजताच सरपंच नितीन थोरात फरार झाले आहेत.


श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे यात्रेनिमित्त लोकनाट्याचा तमाशा सुरू होता. कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असल्याने बेलापूर पोलिस चौकीचे अतुल लोटके हे अंमलदार होमगार्ड यांच्यासोबत तिथे कार्यक्रम बंद करण्यासाठी गेले होते. सरपंच नितीन थोरात यांनी त्यांना मज्जाव केला आणि पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून लोटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून थोरात यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर घटनेनंतर थोरात पसार झाले असून पोलिस पथके त्यांचा शोध घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post