तलाठ्यांच्या वाहनावर ट्रॅक्टर चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न...

दर्यापुर :- तालुक्यातील नांदेड बुद्रुक रेती घाटामध्ये अवैधरित्या रेतीची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती दर्यापूर तहसील तहसीलदार यांना मिळाली असता त्या माहितीच्या आधारे तहसीलदार यांनी आपले सहकारी चार तलाठी अतुल दाळू तलाठी दारापूर, तलाठी राहुल आवारे नांदेडा, तलाठी भारत महाजन मार्कंडा, तलाठी सौरभ वानखडे वडूरा, यांना घटनास्थळी पाठविले असता सदरील रेती घाटातून रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर चालक मालक रेती घेऊन घाटातून फरार होत असता सदर तलाठ्यांनी त्याचा पाठलाग केला व थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने तलाठ्यांच्या वाहनावर ट्रॅक्टर चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही रेती तस्कर हा घटनास्थळावरुन फरार झाला सदर घटनेची माहिती फिर्यादी तलाठी राहुल आवारे यांनी दर्यापूर पोलीस स्टेशनला दिली असून बातमी लिहेपर्यंत चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती पुढील तपास दर्यापूर ठाणेदार प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे

Post a Comment

Previous Post Next Post