घोरपडीच्या शिकारीसाठी गेलेल्या शिकाऱ्याचा घोरपडीवर बलात्कार पण कोणत्या कलमाने गुन्हा दाखल करायचा वनविभाग चिंतेत

कोल्हापूर: शिकारीसाठी कोकणातून कोल्हापूरात आलेल्या एका शिकाऱ्याने घोरपडीवर बलात्कार केल्याचे जिल्ह्यात एक किळसवाना व संतापजनक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी वन विभागाने चार शिकाऱ्यांना अटक केली असून त्यांच्या मोबाईलमधून घोरपडीवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडीओ सापडले आहेत.
हे चार शिकारी कोकणातून शिकार करण्यासाठी कोल्हापूरातील चांदोली भागातील जंगलात आले होते. वन विभागाच्या कॅमेऱ्यात शिकारी कैद झाले होते. त्यामुळे वन विभागाने त्या शिकाऱ्यांचा शोध सुरू केला होता. अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या शिकाऱ्यांना अटक केली. अटकेनंतर जेव्हा ते त्यांची चौकशी करत होते त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांचे मोबाईल तपासले. त्यातील एका मोबाईलमध्ये घोरपडीवर केलेल्या बलात्काराचे चित्रीकरण होते. ते पाहून वन अधिकारी देखील हादरले. असा प्रकार या आधी महाराष्ट्रात कधीच घडला नव्हता. वन अधिकाऱ्यांनी त्या चौघांना ताब्यात घेतले आहे. मात्र त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कलम लावायची याबाबत अद्याप वनविभाग चिंतेत असल्याचे समजले.

Post a Comment

Previous Post Next Post