उपसरपंचाने भर सभेत कॉलर पकडुन केली ग्रामसेवकास मारहाण

दर्यापूर:- पंचायत समिती दर्यापूर च्या आढावा बैठकीमध्ये गौरखेडा येथील ग्रामसेवकास उपसरपंचाकडून मारहाण झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. गौरखेडा येथील ग्रामसेवक प्रेमदास भीमराव गुडधे रा. साईनगर दर्यापूर यांच्या फिर्यादीनुसार गौरखेडा येथील उपसरपंच उमेश महादेवराव गावंडे वय 35 वर्ष रा. गौरखेडा यांनी शौचालयाच्या दाखल्यावरून भर सभेमध्ये माझी कॉलर पकडून मारहाण केली. सभा सुरु आहे थोडा वेळ थांबा असे सांगितल्यावर सुद्धा उपसरपंचाने माझी कॉलर पकडून मारहाण केली. सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करून बघून घेतो अशी धमकी सुद्धा दिली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी उपसरपंचा विरोधात कलम 302/22 कलम 353,506 गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू वपोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post