ब्रह्मपुरी तालुक्यातील इसमाने घेतला गळफास

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील अड्याळ टेकडी येथे इसमाने गळफाम घेवून आत्महत्या केल्याची खळबजनक घटना घडली आहे.

झाडाला गळफास घेवून आत्महत्या करणाया इसमाचे नाव श्री.नामदेव हरिदास नवघडे वय वर्षे 45 असे असून अड्याळ टेकडी गावातील रहिवाशी आहे.

सविस्तर वृत्त असे की आज दिनांक:-3/4/2022 ला नामदेव हा गावालगत असलेल्या जंगलात गेला व झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. कडक उन्हाळा असून प्रखर उन्हात नामदेव काय करीत आहे अजूनही घरी आला का नाही..? म्हणुन नामदेवच्या कुटिंबीयानी नामदेवचा शोध घेतला असता एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. आत्महत्या करण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

नामदेवच्या पश्चात पत्नी दोन मुले व एक मुलगी असा आप्तपरीवार आहे. मात्र घरचा कर्ता पुरुष हा नामदेव असल्यामुळे नामदेव च्या जाण्याने कुटुंबावर मोठे संकठ कोसळले असून नवघडे कुटुंब व गावपटीमर शोकसागरात बुडालेला आहे. घटनेचा पुढील तपास संबंधित पोलीस विभाग कटीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post