पल्सर धारकाने मागेहून कारला टक्कर दिल्याने पल्सर धारक गंभीर जखमी

आरमोरी:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार MH -33 - V- 3328 ही कार आरमोरी वरून वैरागडकडे जात असताना MH- 40- BX- 4019 मागेहून येत असलेल्या डब्बलशिट पल्सर धारकाने मागेहून कारला धडक दिल्याची सदर घटना अंदाजे 1.00 च्या दरम्यान घडली.

मागेहुन कारला धडक मारल्याने दुचाकीचालक रस्त्याच्या कडेला असलेल्या खाईमध्ये पडल्याने त्या दुचाकीस्वाराचा डोक्याला गंभीर जखम होउन आरमोरी येथिल दवाखान्यात हलविण्यात आले आहे अशी माहिती प्राप्त झालेली आहे. तर त्या पल्सरवर मागे बसलेला दुसरा मुलगा सुखरूप आहे. सदर कारधारक हा वडेगाव येथील रहिवासी आहे. तर पल्सर धारक हा आरमोरी येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहिती मिळालेली आहे. हा अपघात कोणत्या कारणामुळे घडला त्याची माहिती अजून पर्यंत मिळालेली नाही.या घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस स्टेशन करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post