वणीत मुस्लिम संघटनेकडून श्रीराम पालखीचे स्वागत तर शोभायात्रा समिती अध्यक्षाचा सत्कार* *रामनवमी उत्सवादरम्यान शोभायात्रेत घडले हिंदू- मुस्लिम ऐकोप्याचे दर्शन*

वणी : परशुराम पोटे

देशात रविवारी मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यात आला. शोभायात्रा दरम्यान काही ठिकाणी समाजकंटकांकडुन दगडफेक करून भक्तीमय वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर एकीकडे हिंदू- मुस्लिम ऐकोप्याचे दर्शन पहायला मिळाले. वणी शहरात मुस्लिम संघटनेकडून श्रीराम पालखीचे स्वागत करुन शोभायात्रा समिती अध्यक्ष रवी बेलूरकर यांचा सत्कार करण्यात आल्याने येथे हिंदू- मुस्लिम ऐकोप्याचे दर्शन पहायला मिळाले.
प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीनं रामनवमीनिमित्त रविवार दिनांक १० एप्रिल रोजी वणी शहरात रामनामाच्या भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
 जुनी स्टेट बँक जवळील श्रीराम मंदिरातून श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तींचे विधिवत पूजन करून या शोभायात्रेला सायंकाळी ६ वाजता प्रारंभ झाला. महिला, पुरुष, बालगोपालांसह आबालवृद्धांच्या या सर्वसमावेशक शोभायात्रेचे यंदाचे मुख्य आकर्षण पालखी, घोडे,रथ, भजन, आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी यासह विशेष आकर्षण म्हणजे नेत्रदीपक रांगोळी होती. पुणे येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार भुषण खंडारे हे शोभायात्रा मार्गावरील प्रत्येक चौकात नेत्रदीपक अशी रांगोळी काढत होते.
जुनी स्टेट बँक जवळील श्रीराम मंदिरातून सुरु झालेली शोभायात्रा शाम टॉकीज चौक, दिपक चौपाटी, भगतसिंग चौक (काठेड चौक), गाडगेबाबा चौक,सर्योदय चौक,टागौर चौक,टुटी कमान चौक,अणे चौक, खाती चौक मार्गे टिळक चौक ( छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथे पोहोचताच मुस्लिम संघटनेकडून श्रीराम पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी श्रीराम नवमी शोभा यात्रा समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भावीक भक्तांना हिंदू- मुस्लिम ऐकोप्याचे दर्शन पहायला मिळाले. तसेच श्री रंगनाथ स्वामी चौक येथे 
रंगनाथ स्वामी सेवा समितीचे अध्यक्ष संजय जुनघरी, ज्ञानेश्वर दुधलकर, उपाध्यक्ष,राजेश मारगमवार सचिव, अनंता मिलमिले सह सचिव, विशाल ठोंबरे कोषाध्यक्ष, सदस्य विलास पारखी  यांच्या वतीने श्रीराम नवमी शोभा यात्रा उत्सव समिती अध्यक्ष रवी बेलूरकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
त्यानंतर शोभायात्रा आंबेडकर चौक, महाराष्ट्र बॅंक चौक मार्गे जुनी स्टेट बँक जवळील श्रीराम मंदिरात पोहोचल्यानंतर महाआरती करून समापन करण्यात आले.
सदर शोभायात्रेत आमदार संजयरेड्डी बोदकुरवार,राजु उंबरकर, राजाभाऊ पाथ्रटकर, बंडोपंत भागवत,प्रशांत भालेराव, दिपक नवले, राजाभाऊ बिलोरीया, दिपक कोकास, राकेश खुराणा, निकेत गुप्ता, उदय जोबणपुत्रा, प्रमोद निकुरे,  राजाभाऊ पांपटीवार,विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे,ओम ठाकुर, बंटी ठाकूर,श्रीकांत पोटदुखे, संतोष डंभारे, मनोज सरमुकदम, कुंतलेश्वर तुरविले, राकेश बुग्गेवार, लवलेश लाल, भास्कर गोरे,कौशिक खेरा, आशिष डंभारे,निलेश डवरे, प्रनव पिंपळे, पंकज कासावार, प्रविन पाठक,नितीन बिहारी, मयुर मेथा, अमित उपाध्ये,नितेश मदिकुंटावार, विशाल दुधबळे, पवण खंडाळकर, इश्वर घाटोळे, अभिजित राऊत,रोहण शिरभाते, कमलेश त्रिवेदी,हिरामल संदलवार, सुभाष वाघळकर, अनिल माहपुरे, शंंकर घुग्गरे, दिपक मोरे, विनय कोंडावार, अशोक घुग्गुल,सुधीर साळी यांचेसह हजारो रामभक्त सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post