*नालीमध्ये पडून फसलेल्या त्या गाईच्या वासराला युवारंग च्या सदस्यांनी दिले जीवनदान*.

आरमोरी :- शहरातील पालोरा रोड वरील भारत गॅस च्या ऑफिस समोरील नव्याने बांधकाम झालेल्या नालीमध्ये एक गाईचे वासरू पडून नालीमध्ये गंभीररीत्या फसलेले होते ही बाब युवारंग चे सदस्य गोपालभाऊ नारनवरे यांना लक्षात आली त्यांनी त्वरित ही बाब युवारंग चे अध्यक्ष मा. राहूलजी जुवारे यांना सुचवली तेव्हा कुठलाही विलंब न करता युवारंग च्या सदस्यांना त्वरित कॉल करून घटनास्थळी एकत्रित करून गंभीररीत्या नालीमध्ये पळून फसलेल्या गाईच्या वासराला दोराच्या सहाय्याने बाहेर काढून सोडण्यात आले त्याप्रसंगी युवारंग चे कोषाध्यक्ष मा.प्रफुलजी खापरे , युवारंग चे सदस्य विशाल जंजालकर, रोहित नैताम , प्रशांत सोरते ,गोपाल नारनवरे प्रफुल मोगरे व वार्डातील नागरिक उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post