*व्यसनामुळे समाजातील तरुणवर्ग अधोगतीकडे जात आहे.* दिलीप भोयर *येणक येथील भागवत सप्ताहात व्यसनमुक्तीवर जनजागृती*

वणी : परशुराम पोटे

समाजामध्ये व्यसनाचे प्रमाण प्रचंड वाढले असून या व्यसनाच्या मगरमिठीत आजचा तरुण वर्ग अधोगतिकडे जात आहे. असे प्रतिपादन येणक येथील आयोजित भागवत सप्ताहात काल ता. ७ एप्रिल रोजी व्यसनमुक्तीवरील समाज प्रबोधनाच्या विषयावर बोलत असताना श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी आपल्या विचारातून व्यक्त केले.
 ४ एप्रिल पासून हनुमान मंदिराच्या परिसरात नत्थुजी पंडिले यांनी भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे. भागवत कथेचे वाचन दयानंदजी महाराज हे करीत असून  या कार्यक्रमात व्यसनमुक्तीवर जनजागृती करण्यासाठी श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी व्यसनापासून समाजात होणारे दुष्परिणाम व समाजाची आर्थिक हानी , वैचारिक हानी कशी होत आहे व तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जाऊन कसा अधोगतिकडे जात आहे यावर सखोल मार्गदर्शन दिलीप भोयर यांनी येणक वासीयांना केले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नात्थुजी पंडिले, तातोबा बोन्डे,राजू गोरे, रणजित बोन्डे, आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post