पुन्हा मिळाला उपग्रहाचा 5 किलो वजनाचा अवशेष...

नागभीड: तालुक्यातील आलेवाही येथील युवक आज तेंदूपत्ता संकलन ना करता जवळच्या जंगलात गेले असता त्यांना सकाळी आठ वाजता गोल ५ किलो वजनी उपग्रहाचा अवशेष मिळाला. 2 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्रासह विदर्भाच्या आकाशात सायंकाळी 7.30 वाजता धूमकेतू सारखा पृथ्वीच्या दिशेने जळताना दिसला. त्याला धूमकेतू समजून आणि लोकांमध्ये भिती पसरली आणि उत्सुकताही वाढली. मात्र त्याच दिवशी सायंकाळी सिंदेवाही तालुक्यातील रात्री धूमकेतू समजल्या जाणाऱ्या वस्तूचे काही अवशेष विखुरले जाऊन बाजूच्या गडबोरी येथे आवारात पडले. त्या नंतर धूमकेतू नसून मानवनिर्मित उपग्रह असल्याची बाब समोर आली होती. 2 एप्रिलच्या रात्री सिंदेवाही येथील गडबोरी येथे अॅल्युमिनियमची गोलाकार रिंग सापडली. त्यानंतर एक दिवसानंतर सिंदेवाही तालुक्यातील पवनपार जंगलात मोहफुल गोळा करण्यासाठी गेलेल्या लोकांना पुन्हा अॅल्युमिनियमचा गोळा सापडला. वजन सुमारे 5 किलो होते, आणि त्याच तालुक्यातील मारेगाव, गुंजेवाही येथे एकाच उपग्रहाचे तीन सारख्या आकाराचे सिलिंडर आढळून आले. नंतर "इस्रो"चे काही सदस्य आले आणि तपासासाठी सिंदेवाही तहसीलमध्ये सापडलेले अवशेष तपासणी करीता घेऊन गेले. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट परिसरात एक याच ऊपग्रहाचा अवशेष आढळून आले होते. त्यानंतर एक आठवडा पुर्वी नवरगाव येथे व आज नागभीड तालुक्यातील आलेवाही येथील तेंदुपत्ता संकलन करणारे युवकांना सिंदबोडी जंगलामध्ये पुन्हा एक त्याच उपग्रहांचा गोलाकार सिलेंडर आढळून आला. त्यानंतर त्यांनी तो वन विभागाच्या स्वाधीन केला.

Post a Comment

Previous Post Next Post