*युवारंग तर्फे समाज जनजागृती रॅली काढून श्री. छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी*.







आरमोरी :- नेहमी , सामाजिक , सांस्कृतिक , औद्योगिक , कृषी , शैक्षणिक , क्रीडा ,पर्यावरण संवर्धन व अन्य क्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या युवारंग तर्फे आज दिनांक १४ मे २०२२ ला *स्वराज्य संस्थापक श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र अजिंक्ययोद्धा, संस्कृतपंडित ,कुशल राजनीतीतज्ञ ,स्वराज्य रक्षक श्री. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्य समाजात जनजागृती रॅली* चे आयोजन करण्यात आले सदर रॅली ची सुरवात सकाळी ७:००वाजता स्वामी विवेकानंद विद्यालय आरमोरी ,येथुन करण्यात आली व रॅली आझाद चौक, गायकवाड चौक , पटेल चौक , छत्रपती शिवाजी चौक येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून पुढे, विठ्ठल मंदिर चौक , नेरल चौक , दुर्गा मंदिर चौक, सराफा लाईन , जुना बस स्थानक, भगतसिंग चौक , पंचायत समिती मार्गे शहरात फिरवुन स्वामी विवेकानंद विद्यालय येथे संपन्न करण्यात आली या रॅलीमध्ये नेत्रदीपविनाऱ्या कलाकृती सादर करण्यात आल्या ज्यामध्ये रॅलीच्या समोर *बैलगाडीवर बसून शेतावर काम करायला जाणाऱ्या शेतकऱ्याची* कलाकृती सादर करण्यात आली त्यापाठोपाठ *आय.ए.एस. अधिकारी , डॉक्टर, शिक्षक, पोलीस अधिकाऱ्यांची* वेशभूषा साकारून महिला स-शक्तिकरनाला चालना देणारी कलाकृती सादर करण्यात आली तर तिसरी कलाकृतीमध्ये *गाव स्वच्छ करून आपल्या किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे कर्मयोगी गाडगे महाराज* यांची कलाकृती सादर करण्यात आली तर चौथ्या कलाकृती मध्ये *स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ ,झाशीची राणी लक्ष्मीबाई , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर* अश्या संपूर्ण देशाला आदर्श असणाऱ्या महिला महापुरुषांची कलाकृती सादर करण्यात आली त्यापाठोपाठ *श्री.छत्रपती संभाजी महाराज व मावळ्यांची* कलाकृती सादर करण्यात आली व राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप,आरमोरी तर्फे कराटे चे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले या रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी *झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा, मुलगी वाचवा मुलगी शिकवा* अशी फलके हातात धरून जनजागृती केली याप्रसंगी शहरातील नागरिक व युवारंग चे सर्व सदस्य या रॅली मध्ये उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post