डॉक्टरने गाठला नीचतेचा कळस, 14 वर्षीय साफसफाई करणाऱ्या मुलीलाही सोडले नाही


महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे उघडकीला आलेली असून शरयू हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर डॉक्टराने बलात्कार केला आणि त्यातून तिला दिवस गेले. लघवी तपासण्यासाठी ती गेली असताना बाथरूममध्ये तिचा गर्भपात झाला त्यानंतर किनवट पोलिसांनी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन डॉक्टरवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, किनवट येथील रमजान गल्ली परिसरात राहणारी 14 वर्षीय मुलगी डॉक्टर विकास सुंकरवार यांच्या शरयू हॉस्पिटल मध्ये नोव्हेंबर 2021 पासून ते मार्च 2022 पर्यंत साफसफाईचे काम करत होती. डॉक्टर विकास याने नोव्हेंबर महिन्यात तिच्यावर दहा ते बारा वेळा अत्याचार केला त्यानंतर तिचे पोट दुखू लागल्याने डॉक्टर सूर्यवंशी यांच्याकडे ती तपासण्यासाठी गेलेले असताना ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले.

बाथरूममध्ये लघवी करत असताना तिचा गर्भपात झाला असे तिने जबाबात म्हटले आहे त्यानंतर किनवट पोलिसांनी आरोपी डॉक्टर विकास सुंकरवार याच्याविरुद्ध कलम 376 376 2 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post