कोरची तालुक्यात विजेचा लपंडाव...! - विद्युत पुरवठा दररोज होतो खंडित... -विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार....

"सुपरफास्ट न्यूज"
सत्यवान रामटेके/उपसंपादक

पूर्वीपासूनच गडचिरोली जिल्हा अतिमागास,दुर्बल व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.मात्र यात सुधारणा न होण्यामागचे कारण म्हणजे नाहक सर्वसामान्य जनतेला त्रास देऊन 'चलती का नाम गाडी'असे केले जात आहे.हल्ली कोरची तालुक्यात विद्युत वितरण कंपनी कडून दररोज विजेचा लपंडाव सुरू असल्याने विद्युत पुरवठा करणाऱ्या कोरची तालुक्यातील वितरण कंपनीचा भोंगळ कारभार निदर्शनास येत आहे.
सुपरफास्ट न्यूजचे उपसंपादक सत्यवान रामटेके यांनी हल्ली कोरची तालुक्यातील ग्रामीण भागात दौरा करून तेथील परिस्थिती जाणून घेतली व चार ते पाच दिवस ग्रामीण भागात मुक्काम केला असता खरोखरच विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.साधी हवा सुद्धा आली तर तासणं-तास वीज पुरवठा खंडित होत असतो.काही गावातील साध्या भोळ्या-भाबळ्या सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न विचारले असता 'आमच्याकडे कोण लक्ष घालणार'असे उत्तर मिळाले.काहींच्या मते,पावसाळ्यात तर तीन-तीन दिवस विद्युत पुरवठा खंडित असतो असे म्हणणे आहे.हल्ली दिवसा बरोबरच रात्रोच्या सुमारासही विजेचा लपंडाव सुरू असल्याने महिना होत नाही तर विजेचे देयक येऊन ठेपली जातात.दररोज लाईन ट्रिप झाली,झाडे कोसळली,फॉल्ट सापडत नाही,वरूनच लाईट गेली,आमच्या हातात काही नाही,अर्ध्या तासाने,एक तासाने लाईट येणार नेहमीची कारणे दाखवून विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपनीचा बोलबाला केवळ कोरची तालुक्यातच नसून इतरही तालुक्यात पहावयास मिळतो आहे.
कोरची तालुक्यात असे भोंगळ कारभार करणाऱ्याविषयी व सर्वसामान्य जनतेविषयी आवाज उठवणारे वाली आहेत की नाही?असा प्रश्न निर्माण झाला आहे.सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने याकडे लक्ष घालणार कोण?अन्यथा 'आम्ही करू ती,पूर्वदिशा'असे झाल्याशिवाय राहणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post