नक्षलवादयानी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एका इसमाची केली कु-हाडीने हत्या

गडचिरोली दी, १५ में :– नक्षलवादयानी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एका इसमाची कु-हाडीने हत्या केल्याची घटना दि, १४ मे रोजी घडली आहे…

नक्षलवाद्यांनी हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव रामजी तिम्मा वय ४० वर्ष असून एटापल्ली तालुक्यातील पोलीस मदत केंद्र हालेवारा अंतर्गत येत असलेल्या मेंढरी या गावातील रहिवासी आहे .

नक्षलवाद्यांनी हत्या करून मृत शरीराजवळ टाकलेल्या पत्रकात सदर मृतक आत्मसमर्पित नक्षल असून पोलिसाँचा खबरी असल्याच्या संशय व्यक्त केला आहे. मागील झालेल्या घटनेत पोलिसांना सहकार्य करुण एका नक्षल कमान्डरला (काँम्रेडला) मारण्यात मृतकाचा हात असल्याचा टाकलेल्या पत्रकात उल्लेख केलेला आहे.

पोलिसांना नक्षलवाद्यांनी हत्या करण्यात आल्याचे माहिती प्राप्त होताच पोलिस घटनास्थळी दाखल होवून मोका पंचनामा करून मृतकाची बॉडी ताब्यात घेवून एटापल्ली येथील रुग्णालयात शवविच्छेदन करून परिवारला देण्यात आले आहे .

नक्षलनी अतिदुर्गम भागात  हत्या ,मारझोड करीत असल्याने  पुन्हा नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Post a Comment

Previous Post Next Post