चारचाकीच्या अपघातात 5 वर्षीय बालक ठार


हर्षा नंद कऱ्हाडे प्रतिनिधि

मूल तालुक्यातील आकापूर येथील 5 वर्षीय बालकाचा क्रेटा या चारचाकी गाडीने अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. आयुष साईनाथ सोयाम वय वर्ष 5 असे मृतक बालकाचे नाव आहे. ही घटना आज दिनांक सकाळी 10.30 वाजताचे दरम्यान घडली.

आयुष हा शौचास रस्त्याचे बाजूला बसला होता. तो उठून घरी जाण्यासाठी वळत असतानाच सावली वरून गाडी नं. एम एच 34 BB 0149 क्रेटा कंपनीची गाडी भरधाव वेगाने असल्याने 5ही माहिती गाववासियांना होताच लगेच आयुष ला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता आणले मात्र डाक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

साईनाथ सोयाम यांना एक मुलगी वय 9 वर्षाची असून मृतक आयुष हा एकच मुलगा होता. 5 वर्षीय बालकाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करीत आहे.

अपघाती वाहन सावली येथील नंदकिशोर सारडा यांच्या मालकीची असल्याची विश्वसानीय माहिती आहे. गाडी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सतीशसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश बनसोड, पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुध्ये करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post