लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असलेल्या एका तरुणीचे तरुणासोबत भांडण झाले आणि तिने संतप्त होऊन त्याच्या घरी जात तिने आणि तिच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांसह त्याच्या नातेवाईकांना केली बेदम मारहाण

पुणे शहरात एक खळबळजनक घटना मांजरी इथे उघडकीस आलेली असून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असलेल्या एका तरुणीचे तरुणासोबत भांडण झाले आणि तिने संतप्त होऊन त्याच्या घरी जात तिने आणि तिच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांसह त्याच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मुलाचे वडील असलेल्या 52 वर्षीय नागरिकाने या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मुलगी माधुरी राऊत तिची आई , वडील, मनोज पाटील, आकाश राऊत, रामदास लोहकरे ( सर्वजण राहणार हडपसर ) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

फिर्यादी व्यक्ती हे तीन वर्षांपासून मांजरी परिसरात राहत असून त्यांचा 23 वर्षाचा मुलगा हा खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतो. गेल्या दीड वर्षांपासून तो माधुरी हिच्यासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत असून त्यांच्यामध्ये भांडण झाल्यानंतर माधुरी ही माहेरी निघून गेली होती त्यानंतर शनिवारी रात्री माधुरी आई वडील आणि तिच्या नातेवाईकांना घेऊन तक्रारदार यांच्या घरी आली आणि बोलायचे आहे असे सांगत घरात घुसली आणि त्यानंतर घरातील सर्वांना बेदम मारहाण करण्यात आली.


सदर प्रकार घडल्यानंतर तक्रारदार यांच्या मुलीने तिच्या भावाला बोलावून घेतले त्यानंतर तिचा भाऊ पोहोचला आणि अवघ्या काही वेळात पोलीसही घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी मात्र त्याच्या आधीच माधुरी आणि तिच्या नातेवाईकांनी तक्रारदार यांच्या कुटुंबाला मारहाण केली होती आणि तिथून पलायन केले होते त्यानंतर तक्रारदार यांनी पोलिस ठाणे गाठले आणि माधुरी आणि तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post