तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वनमाळी व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार

आरमोरी- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना
पटोले हे गडचिरोली दौऱ्यावर असताना आरमोरी येथील तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वनमाळी व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच पटोले यांना अनेक कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी विविध समस्यांचे निवेदन देऊन दखल घेण्याची मागणी सुद्धा केली. यावेळी नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागावे व गडचिरोली जिल्हा काँग्रेसमय करावा असे सांगितले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून किनारा रेस्टॉरंटचे व्यवस्थापक अँड. विजय चाटे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पटोले यांनी चाटे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी नाना पटोले यांच्यासोबत माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी आ. सतीश वारजूरकर, माजी आ. आनंदराव गेडाम, रमेश चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे आदी सोबत होते.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे जंगी स्वागत करतांना आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वनमाळी, देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष परसराम टिकले, आरमोरी पं.स.चे माजी सभापती अशोक वाकडे, माजी जि. प. सदस्या मनीषाताईदोनाडकर, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष लोकेश गारोदे, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शालीक पत्रे, उपाध्यक्ष विजय सुपारे, वामनराव सावसागडे, काँग्रेसचे कोषाध्यक्ष प्रा. शशिकांत गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष तेजस मडावी, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष निर्मला किरमे, आदिवासी काँग्रेसचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम, नगरसेविका उषाताई बारसागडे, एन. एस. यु. आय. आरमोरी तालुकाध्यक्ष अंकुश गाढवे, देसाईगंज पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन राऊत, देसाईगंज न. प. चे नगरसेवक हरीश मोटवाणी, पिंटू बावणे, नंदू नरोटे, आरमोरी पं. समितीचे माजी उपसभापती तुळशीदास काशीकर, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते रामभाऊ हस्तक, सुभाष सपाटे, नरेंद्र गजपुरे, माजी उपसभापती विनोद बावनकर, नरेश टेंभुर्णे, भुपेश कोलते, विकास निंबेकर, नीलकंठ गोहणे, अनिल किरमे, मुखरू वाघाडे, प्रवीण रहाटे, संजय लोणारे, भीमराव बरसागडे, दिगेश्वर धाईत, राहुल धाईत, सरपंच मिथुन प्रधान, निलोफर शेख, पुष्पलता श्रीरामे, सोनू लिंगायत यासहित आरमोरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post