केरळ मध्ये मुली करत आहेत मुलाच्या मांडीवर बसून आंदोलन..

केरळ:- आपल्याकडे स्त्री-पुरुष समानतेचे धडे देण्यासाठी आजवर कित्येक आंदोलने करण्यात आली आहेत. परंतु त्याचा काही फरक येथील लोकांवर पडलेल्या दिसत नाही. त्यामुळेच केरळमधील इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीचे आंदोलन पुकारले आहे. या विद्यार्थ्यांचे सध्या सोशल मीडियावर कौतुक देखील होत आहे.

केरळमधील त्रिवेंद्रम इथल्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग त्रिवेंद्रम या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांना समानतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘हे सीट ऑन लॅप’ आंदोलन सुरू केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कॉलेजच्या जवळ असलेल्या बसस्टॉपवर ही सर्व मुले रोज भेटत असतं. हा स्पॉट म्हणजे त्यांच्या भेटण्याचा अड्डाच होय.

परंतु त्यांचे हे वागणे तेथील नागरिकांना पटत नव्हते. मुला मुलींनी एकत्र येणे, हसणे मजा मस्ती करणे, हे स्पॉट जवळ राहणाऱ्या रहिवाशांना खटकत होते. या रहिवाशांनी या मुलांविरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. त्यामुळे या रहिवाशांना धडा शिकवण्यासाठी तसेच त्यांना समानतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी या मुलांनी ‘हे सीट ऑन लॅप’ आंदोलनाला सुरुवात केली आहे.


सध्या या आंदोलनाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ही आंदोलन करणाऱ्या तरुण मुली छोट्या बेंचवर मुलांच्या मांडीवर बसलेल्या दिसत आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. अनेकांनी त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post