गणेशपूर येथील गावकऱ्यांनी दारू विक्रेत्यांची पकडली दारू , मोहफुलाची दारू जप्त करून पोलीस विभागाच्या केले स्वाधीन .....!

दिनेश बनकर जिल्हा प्रतिनिधी
सुपर फास्ट बातमी 7822082216

आरमोरी:-
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील गणेशपूर येथे
अवैध रित्या दारू विकत असल्याची माहिती
पोलीस पाटील रोशन कोटगले व तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश कोहपरे यांना मिळाली यावरून धाड मारून नामे निलेश सदाराम पदा यांना दारू विक्री
करत असताना रंघेहात पकळुन दारू पोलिसांचे
स्वाधीन करण्यात आली .सदर दारू विक्री करणारा इसम हा गणेशपूर येथील सुनीता बाळकृष्ण वट्टी यांचा जावई असल्याचे समजते दारू विक्रेता हा गणेशपूर येथील जावई असल्याचा फायदा घेत गणेशपूर येथे दारू विक्री करत असल्याचे बोलले जात आहे.


सदर दारू विक्री कारवाईमध्ये गणेशपूर येथील
तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश कोहपरे पोलीस पाटील
रोशन कोटगले मधुकर चापले प्रफुल फुकटे डमबाजी सलोटे व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले पुढील कारवाई आरमोरी पोलीस करीतअसल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post