उंदीर खाऊन, मुलींना विकून पोट भरणार्‍या पश्‍चिम बंगालमध्ये मंत्र्यांच्या घरी मात्र नोटांचा खजीना


पार्थ चॅटर्जी, अर्पिता मुखर्जीच्या शिक्षक भरती घोटाळ्याने हैराण होण्याची वेळ

पश्‍चिम बंगाल: एका बाजूला उंदीर खाऊन, मुलींना विकून पोट भरणार्‍या पश्‍चिम बंगालसारख्या राज्यात मंत्र्यांच्या घरी नोटांचा खजीना सापडल्याने देशात कशाप्रकारे भ्रष्टाचार वाढलाय हे दिसून येत आहे. पार्थ चॅटर्जी, अर्पिता मुखर्जीच्या शिक्षक भरती घोटाळ्याने हैराण होण्याची वेळ आली असून ईडीची कारवाई म्हणजे फार्स नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.


पार्थ चॅटर्जी, अर्पिता मुखर्जीच्या घरी ईडीने छापा टाकल्यानंतर ५० कोटींचे घबाड सापडले आहे. या छापेमारीमुळे बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. एका बाजूला मंत्र्यांच्या घरी नोटांचा खजीना सापडत असताना दुसर्‍या बाजूला या राज्यातील लोक आपली भूक मिटवण्यासाठी मुलींना विकत आहेत. एवढेच नव्हे तर उंदीर खाऊनही जीवन जगावे लागत आहे.



गरीबीमुळे काही मुली देहविक्रीकडे वळल्या आहेत. युनिसेफच्या अहवालानुसार पश्‍चिम बंगाल सर्वात जास्त चौथ्या लोकसंख्येचे राज्य आहे. या राज्याची लोकंख्या ९१.३ मिलीयन आहे. त्यातील पाचवा हिस्सा गरीब आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या २.७ टक्के हिस्सा आहे. लोकसंख्येच्या घनतेमुळे सार्वजनिक सुविधा पुरवण्यात अपयश आलेले आहे.


सर्वाधिक आठ गरीब राज्यात पश्‍चिम बंगाल आहे. आरोग्य, शिक्षण, जीवनस्तरावरील सामाजिक संकेतांचा अभाव जाणवत आहे. या राज्यात मजबूत राज प्रणाली होती. परंतु ती आता फोल ठरली आहे. २००५ नंतर पश्‍चिम बंगालमधील गरीबी कमी झाली आहे. सामाजिक, आर्थिक, औद्योगिक नीतीचा परिणाम झाला असल्याने या राज्याचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही.



काही महिला देहविक्रीकडे वळल्या आहेत. राजधानीतील सोनागाछी आशियातील सर्वात मोठा रेडलाईट विभाग आहे. इंग्रजांच्या कालखंडात याठिकाणी मोठ्या प्रमाणात देहविक्री व्हायची. गरीब महिला कामाच्या निमित्ताने येतात, मात्र दलालांमार्फत त्यांना देहविक्रीकडे पाठवले जाते. आपला घरखर्च चालवण्यासाठी त्यांना देहविक्री करावी लागत आहे.


बंगालमधील काही जिल्ह्यात उपासमारीमुळे लोक आपल्या नवजात बालकांना विकतात. नवजात बालकांना विकून आपली भूक भागवली जाते. उत्तर २४ परगना जिल्ह्यात अशाप्रकारच्या घटना रोजच घडत असतात. ४ दिवसाच्या नवजात अर्भकाला ५० हजारात विकले गेले होते. 



तर पुरूलिया जिल्ह्यात आजही अधिक लोकसंख्या गरीबी रेषेखाली आहे. त्यातच त्यांना उपासमारीने पछाडले आहे. येथील लोकांना सरकारचे मोफत रेशनही मिळत नाही. त्यामुळे आपले पोट भरण्यासाठी त्यांना उंदीरांना मारावे लागते. उंदीराचे मटण खाल्ल्याने लोकांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागते.

Post a Comment

Previous Post Next Post