राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी पुन्हा एकदा केले वादग्रस्त वक्तव्य


Maharashtra:- राज्यपाल भगतसिंह कोशारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही अस वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केले आहे.

त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज्यपालांवर टीका केली आहे. तर, राज्यपालांनी नको त्या गोष्ट्रीत नाक खुपसु नये, गुणा गोविंदान नांदाव असा सल्ला मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.


राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची माफी मागण्याची मागणी

मुंबई महाराष्ट्राला मिळाली ती 105 हुतात्मांच्या बलिदानामुळे. मुंबईची प्रगती आणि महाराष्ट्राची प्रगती इथे राहणाऱ्या मराठी माणसामुळे झालेली आहे. जे बाहेरचे आले त्यांना मुंबईने सामावून घेतले आहे याचा अर्थ त्यांच्यामुळे मुंबईची प्रगती झाली नाही. मुंबई महाराष्ट्रात आहे राज्यपालांनी पहिले समजून घ्यावं. मराठी माणसामुळेच मुंबई आहे आणि महाराष्ट्र आहे तिथे काय कोणी बाहेरचे आले आणि त्यांनी प्रगती त्याच्यामुळे आपली प्रगती झाली नाही त्यांची प्रगती झालेली आहे असे संदिप देशपांडे म्हणाले.


Post a Comment

Previous Post Next Post