हेटी येथील साईनाथ कुमरे जवळ तब्बल आढळले 32 लाख 62 हजार 210 रूपये

गडचिरोली : जिल्हयातील धानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हेटी येथील साईनाथ कुमरे (50) याच्याकडे लाखोंची रोकड असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली असता 23 ऑगस्ट रोजी छापा मारुन घराची झडती घेऊन तब्बल 32 लाख 62 हजार 210 रुपयांची बेहिशेबी रक्कम आढळून आली आहे. सदर प्रकरणाने जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, काल 23 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास पोलीस स्टेशन धानोरा येथील पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांना गोपनिय सुत्राकडून हेटी येथील साईनाथ कुमरे (50) याच्या घरी बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव तसेच पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी दिली.

दरम्यान तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीसनिरीक्षक यांनी सदर माहिती पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांना देवून पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्यासह पोलीस पथक दोन पंचासह हेटी येथील साईनाथ कुमरे याच्या घरी पाठवून घराची झडती घेतली असता घरात भारतीय चलनातील एकुण 32 लाख 62 हजार 210 रुपयांची बेहिशेबी रोकड मिळाली. याप्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी अप्पर आयकर निदेशक नागपूर यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे. सदर करावाई पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधिक्ष समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक अनुज तारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस स्टेशन धानोर येथील पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे, पोहवा नैताम, पोना बोरकुटे, पोना उसेंडी, पोशि दुग्गा, पोशि कृपाकर, पोशि आडे, मपोशि खोब्रागडे, मपोशि गोडबोले तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रं. 10 चे 17 कर्मचारी यांनी केली.


गुन्हा तर घडलाच, तरीही सोडले कसे?

■ वास्तविक कोणत्याही ठोस कारणाशिवाय घरात एवढी रक्कम रोख स्वरूपात ठेवता येत नाही. या प्रकरणात तर ज्यांच्या घरी ती रक्कम सापडली त्यांनी ती सट्टापट्टीतील असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सट्टीपट्टीचा व्यवहार असो किंवा नक्षल समर्थक कृती असो, दोन्ही गुन्हा ठरत असताना पोलिसांनी कोणताच गुन्हा दाखल न केल्यामुळे या प्रकरणात नेमके काय शिजत आहे? अशी शंका-कुशंका नागरिक व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post